Mahesh Babu Eat Curd Rice : तेलगू अॅक्टर महेश बाबू यांना कोण नाही ओळखत. आपला उत्तम अभिनय, उत्कृष्ट डान्स आणि हटके शैलीने लाखो-करोडो चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या या अभिनेता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. ५१ वर्षाच्या अभिनेत्याची जीवनशैली, राहणीमान आणि आवडी-निवडी जाणून घेण्यास त्याचे चाहते नेहमीच उत्सूक असतात. सध्या त्याच्या एका मुलाखतीची चर्चा सुरु आहे ज्यात त्याने आपल्या आहाराबाबत खुलासा केला होता जेव्हा त्याला पेस्ट्री, बर्गर आणि दही भातपैकी एक पदार्थ निवडण्यास सांगितले तेव्हा यापैकी तो काहीही खात नाही असे सांगितले.
ईगल मीडिया वर्क्सने २०२२ तेलुगू भाषेत दिलेल्या मुलाखतीमध्य महेश बाबूने सांगितले,”मी यापैकी काहीही खात नाही. मी दुधाचे पदार्थ खाणे टाळतो. मी ब्रेड खात नाही त्यामुळे बर्गर खाण्याचा प्रश्नच येत नाही. हे खाणे थांबवून बराच काळ झाला. मी कधी कधी गोड पदार्थ खातो पण फार क्वचितच.”
यापार्श्वभूमीवर द इंडियन एक्सप्रेसने, आहारात दुग्धजन्य पदार्थ न घेण्याबद्दल तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेतले.
याबाबत ठाण्यातील केआयएमएस हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ असलेले डॉ. अमरीन शेख यांनी सांगितले की, दही भात अजिबात आरोग्यास हानिकार नाही. फक्त त्यात भात व दही दोन्ही आहेत म्हणून एका निरोगी व्यक्तीने तो सोडून देण्याचे काहीच कारण नाही; उलट, दह्यातून प्रथिने, कॅल्शियम आणि पचनास मदत करणारे उपयुक्त जीवाणू मिळू शकतात. “खरी समस्या भाताचे प्रमाण, वापरल्या जाणाऱ्या भाताचा प्रकार आणि पदार्थात समाविष्ट असलेल्या इतर घटकांमध्ये आहे.
तरीही, एखादी व्यक्ती दही टाळण्याचा निर्णय का घेऊ शकते याची वैयक्तिक कारणे असू शकतात. शेख यांनी नमूद केले की, ज्यांना lactose intolerant आहे, दुधातील प्रथिनांची ऍलर्जी आहे किंवा ज्यांना पचनसंस्थेच्या काही विशिष्ट समस्या आहेत, त्यांना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर पोट फुगणे, अस्वस्थता किंवा इतर लक्षणांचा त्रास होऊ शकतो. “अशा परिस्थितीत, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळणे किंवा त्यात बदल करणे योग्य ठरू शकते,” असे शेख म्हणाले.
शेख यांनी यावरही जोर दिला की, पॉलिश केलेल्या पांढऱ्या तांदळापासून बनवलेला दही भाताने पोट भरणार नाही आणि जे लोक आपले वजन किंवा रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हे कर्बोदकांचे प्रमाण बरेच जास्त असू शकते. “मात्र, याचा अर्थ असा नाही की दही भात पूर्णपणे टाळावा; तांदळाचे प्रमाण कमी करून आणि त्यात भाज्या, बिया किंवा प्रथिनेयुक्त पदार्थ घालून तो अधिक संतुलित बनवता येतो,” असे गोयल यांनी सांगितले.
एखाद्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक खाण्याच्या आवडीनिवडींना आरोग्याचा सर्वसाधारण नियम मानणे तितकेच महत्त्वाचे आहे. “महेश बाबू यांची स्वतःची आहाराची पद्धत आणि फिटनेसची उद्दिष्ट्ये असली तरी, अत्यंत संघटित जीवनशैली( highly organised lifestyle) जगणाऱ्या अभिनेत्यासाठी योग्य असलेला आहार सर्व लोकांसाठी आवश्यक असेलच असे नाही,” असे शेख म्हणाले.
सर्वसामान्य व्यक्तीसाठी, एकाच खाद्यपदार्थाची चिंता न करणे अधिक महत्त्वाचे आहे. “जर तुम्ही दहीभात खात असाल, तर तो योग्य प्रमाणातच खावा, चांगल्या प्रतीचे दही वापरावे आणि त्यासोबत भाज्या तसेच पुरेशा प्रमाणात प्रथिने घ्यावीत याची खात्री करा. संतुलित आहाराचा अर्थ असा नाही की तुम्हाला परिचित असलेले पदार्थ सोडावे लागतील. सामान्यतः योग्य प्रमाण आणि एकंदरीत योग्य मिश्रण साधणे हीच महत्त्वाची बाब असते.,” असे शेख यांनी सांगितले.
