Why moong dal is best for diabetic Patient : भारतीय जेवणात डाळींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मधुमेह असलेल्या लोकांसाठी डाळी या अत्यंत पौष्टिक आणि फायदेशीर आहेत. जेव्हा कर्बोदके शरीरात सहजपणे शोषून घेतले जातात, तेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी हळूहळू वाढते; पण डाळीतील फायबर कर्बोदके शोषण्याची क्षमता कमी करतात आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात; जे स्नायूंना मजबूत करण्यासाठी गरजेचे आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल, तर हा एक उत्तम स्रोत आहे. मांसाहारी लोकसुद्धा एक उत्तम पर्याय म्हणून डाळीचे सेवन करू शकतात. कडधान्यांमध्ये सहसा फॅट्सचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे तुमच्या कंबरेवरील फॅट वाढत नाही.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तीन चमचे कडधान्य (७० ग्रॅम) हे भाजीपाला आणि फळांइतकेच पोषक घटक पुरवते. ज्या दिवशी तुम्ही फळे किंवा भाज्यांचे सेवन केले नाही, त्या दिवशी तुम्ही डाळीचे सेवन करू शकता. त्याविषयी अपोलो रुग्णालयाच्या मुख्य पोषण तज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

former rto commissioner Mahesh zagade
‘परिवहन’च्या कामकाजावर माजी आयुक्तांचेच बोट! मध्यस्थांसाठी यंत्रणा असल्याचा गंभीर आरोप
Early Signs Of Oral Cancer
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असतात ‘हे’ ८ लहानसे बदल; दात घासताना ‘असा’ करा तपास; ‘या’ अवयवांना सुद्धा होतात वेदना
PM Modi Letter After 45 Hours Meditation
४५ तास ध्यान करताना नरेंद्र मोदींनी काय अनुभवलं? पंतप्रधानांनी स्वहस्ते लिहिलेलं पत्र वाचा, म्हणाले, “माझ्या शरीराचा प्रत्येक कण..”
married couple separation marathi news
वैवाहिक जोडीदार कराराद्वारे विभक्त होऊ शकतात का ?
Loksatta editorial Election Commission is impartial About the disturbance at the polling stations
अग्रलेख: कल्पनाशून्य कारभारी!
Boycott the polls to protest the inattention to the issues
नाशिक : समस्यांकडे दुर्लक्षाच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार
what happens if you give up dal for a month
महिनाभर डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात?
Benefits Of Adding Jaswandi Petals In Tea Can gudhal Phool Help Reduce Blood Sugar
चहात ‘या’ फुलाच्या पाकळ्या घातल्याने डायबिटीस कमी करण्याचा मार्ग होईल सोपा? तज्ज्ञांनी सांगितलं किती हवं प्रमाण?

कोणत्या डाळीचा आहारात समावेश करावा?

डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात, “मूगडाळीचा आहारात समावेश करावा. या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स ३८ असतो. एखादा पदार्थ आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर किती लवकर परिणाम करू शकतो, यावरून ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो. ५५ पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला समजला जातो. मूगडाळीमध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात. त्या डाळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. २०१५ च्या एका अभ्यासात सांगितले आहे की, मूगडाळीपासून बनवलेली बिस्किटे ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटिन्स व मिनरल्स असतात. या डाळीमध्ये असलेल्या लोहामुळे मधुमेह असलेल्या लोकांचा अशक्तपणा दूर होतो.”

त्या पुढे सांगतात, “मूगडाळ शिजायला फार वेळ लागत नाही. मूगडाळ खाल्यानंतर भूक नियंत्रणात राहते. शिजवण्याच्या पद्धतीमुळे डाळीच्या ग्लायसेमिक इंडेक्सवर परिणाम होतो; पण शिजवल्यानंतरही त्यात भरपूर षोषक घटक असतात.”

हेही वाचा : तुम्हाला दूध प्यायला आवडत नाही? मग शरीरात कॅल्शियमची पातळी कशी वाढवाल? तज्ज्ञांनी सुचविले हे चांगले पर्याय….

मूगडाळीचा आहारात समावेश कसा करावा?

आपण अनेकदा आहारात डाळीचा समावेश करतो; पण वेगवेगळ्या पद्धतीने डाळीचा समावेश करू शकता. तुम्ही डाळीचे सूपमध्ये घालून सेवन करू शकता किंवा डाळ उकळून खाऊ शकता. त्याशिवाय तुम्ही मूगडाळ सॅलडमध्ये एकत्रित करून आहारात घेऊ शकता.
आहारातील पौष्टिक घटकाबरोबरच जीवनशैलीतील इतर घटकांचा विचार करून मूगडाळ ही उत्तम पर्याय म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.