पावसाळा सुरु झाला की आपल्याला आसपास लोकांच्या शिंकण्याचे किंवा खोकल्याचे आवाज सतत ऐकून येतात पण यामागे एक कारण आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असतो, हवेत ओलावा जास्त असतो ज्याचा श्वसनाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या, इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसीन विभागामध्ये सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.विश्वेश्वरन बी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला याबाबत माहिती देताना स्पष्ट केले की,”विविध पर्यावरणीय घटकांमुळे पावसाळ्यात श्वसनासंबंधित आजारांचे प्रमाण वाढते.”

वाढलेले वायुजन्य प्रदूषक (Increased Airborne Pollutants):

पावसाळ्यात, साचलेले पाणी आणि उच्च आर्द्रता हे सर्व घटक बुरशीच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती निर्माण करतात. ही बुरशी हवेत बीज सोडते ज्यामुळे दमा, ब्राँकायटिस आणि श्वसनाच्या इतर अ‍ॅलर्जीसारख्या श्वसनसंबधीत आजार निर्माण करू शकते. याव्यतिरिक्त, वातावरणात वाढलेल्या ओलाव्यामुळे घरगुती धुळीत असलेले सुक्ष्मजीवांचा प्रसार होऊ शकतो, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या आणखी वाढू शकतात.

जलजन्य आजार (Waterborne Diseases):

अतिवृष्टीमुळे पूर येतो ज्यामुळे पिण्याचे पाणी अनेकदा रोगजनकांसह दूषित होते. यामुळे जलजन्य आजार होऊ शकतात जे अप्रत्यक्षपणे श्वसन आरोग्यावर परिणाम करतात आणि एकूण आरोग्यावरच परिणाम होतो. दूषित पाणी चुकून शरीरात गेल्यास श्वासोच्छवासात संसर्ग होऊ शकतो.

घरातील हवेची खराब गुणवत्ता (Poor Indoor Air Quality):

वाढत्या पावसामुळे लोक खिडक्या बंद ठेवतात, ज्यामुळे घरातील मोकळी हवा कमी होते आणि घरातील हवेची गुणवत्ता खराब होऊ शकते. या कोंडलेल्या घरातील हवेमध्ये अनेकदा अ‍ॅलर्जी आणि प्रदूषकांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे श्वसन प्रणालीला त्रास होऊ शकतो. ओलसरपणामुळे भिंती आणि छतावर बुरशी वाढणे हे देखील खराब हवेच्या गुणवत्तेत योगदान देते.

हेही वाचा – दुधात भिजवलेले मनुके खाल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? (how to protect yourself espiratory diseases in the monsoon)

डॉ. विश्वेश्वरन यांनी पावसाळ्यात श्वसनाच्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या:

स्वच्छता राखा (Maintain Cleanliness):

बाथरुम आणि तळघर यांसारख्या बुरशी होण्याची शक्यता असलेल्या जागा नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करा. घरातील आर्द्रतेची पातळी कमी करण्यासाठी आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी डिह्युमिडिफायर(Dehumidifiers) वापरा.

एअर प्युरिफायर (Air Purifiers):

हवेतील अ‍ॅलर्जी आणि प्रदूषक काढून टाकण्यासाठी HEPA फिल्टरसह एअर प्युरिफायर वापरा. भिंतीवर बुरशी होणे रोखण्यासाठी एसी (air conditioning ) नियमितपणे स्वच्छ आणि देखभाल केली जात असल्याची खात्री करा.

हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करा (Monitor Air Quality:)

स्थानिक हवेच्या गुणवत्तेच्या अहवालांकडे लक्ष द्या आणि प्रदूषकांची पातळी जास्त असताना आवश्यक खबरदारी घ्या. उच्च प्रदूषणाच्या काळात घरात राहणे सुरक्षित आहे.

हायड्रेशन आणि स्वच्छता (Hydration and Hygiene) :

जलजन्य रोग टाळण्यासाठी स्वच्छ, फिल्टर केलेले पाणी प्या आणि चांगली वैयक्तिक स्वच्छता ठेवा. वारंवार हात धुवा आणि श्वसन संक्रमणाची लक्षणे दर्शविणाऱ्या व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा.

डॉक्टरांची मदत घ्या(Medical Care) :

हेही वाचा – झोपेतून उठताच आणि वर्कआऊटच्या आधी दोन ग्लास पाणी प्यायल्यास वजन कमी होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा….

जर तुम्हाला आधीपासून असलेल्या श्वसनासंबधीत आजार होत असतील डॉक्टरांची मदत घ्या. नियमित तपासणी आणि श्वसनाच्या समस्यांवर त्वरित उपचार केल्याने लक्षणे प्रभावीपणे उपचार करण्यात मदत होऊ शकते.

या संरक्षणात्मक उपायांचे पालन करून, व्यक्ती पावसाळ्याचा श्वसनाच्या आरोग्यावर होणारा परिणाम कमी करू शकतात आणि एकूणच आरोग्य उत्तम ठेवू शकतात.