Fermented foods : आपला देश असा आहे की, जिथे दिवसाची सुरुवात चहा आणि नाश्त्याने होते. त्यामध्ये विशेषत: नाश्त्यामध्ये आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, ढोकळा इत्यादी पदार्थांचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असले तरी आपण ते नियमित खाऊ शकत नाही. तु्म्हाला वाटेल, असं का? द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

दिल्ली येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या आहार तज्ज्ञ दिव्या मलिक धवन सांगतात, “आंबवलेले पदार्थ जरी संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीही त्याच्या अतिसेवनामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. काही आंबवलेल्या पदार्थांमध्ये अतिप्रमाणात मीठ आणि साखर असते; ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होणे, पोट जड वाटणे किंवा अतिसारसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यीस्ट (bacteria)च्या मदतीने पदार्थ आंबवला जात असल्यामुळे पदार्थ घट्ट होतो; ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.”

Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
Rice lovers we this hack that claims it can help counter diabetes how it works and what can be the possible risks one can avoid must read
भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? मधुमेही रुग्णांसाठी ठरेल का धोक्याची घंटा? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
side effects of vitamin c
‘व्हिटॅमिन सी’ अति सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Sunita Williams
किडनी स्टोन ते कर्करोगाची शक्यता; अंतराळातील मुक्काम वाढल्याने सुनीता विल्यम्स यांच्यासमोर कोणती आव्हाने?
What are hormones
हार्मोन्स म्हणजे काय? स्त्रियांच्या शरीरावर त्यांचा कसा परिणाम होतो? घ्या जाणून …
Monsoon foods: Which ones should you eat and which ones should you avoid
Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

आयुर्वेदिक अभ्यासक डॉ. वरलक्ष्मी यनामंद्र यांनीसुद्धा अशीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या सांगतात की, आंबवलेले पदार्थ पचायला हलके आणि नियमित खाण्यासाठी योग्य नसतात. “डोसा आणि इडली हे दक्षिण भारतातील लोकप्रिय पदार्थ असले तरी ते पदार्थ नियमित खाणे चांगले नाही,” असे डॉ. वरलक्ष्मी यनामंद्र यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे? जाणून घ्या, मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे

पाहा व्हिडीओ

इडली आणि डोशाचे उदाहरण देऊन डॉ. यनामंद्र सांगतात, “उडीद डाळ ही पौष्टिक मानली जाते; पण त्याचबरोबर ही डाळ पचायला जड, गरम आहे. ही डाळ शरीरातील टिश्यूंना ब्लॉक करते. त्यामुळे त्वचेचे आजार, रक्तस्राव आणि जळजळ होत असताना हे पदार्थ खाऊ नयेत. त्याशिवाय उडीद दाळ ही पित्त आणि कफ दोन्ही वाढवते.”

इडली, डोसा हे आंबवलेले पदार्थ पचायला हलके नसतात?

आहारतज्ज्ञ दिव्या मलिक धवन सांगतात, “इडली आणि डोसा हे हलके पदार्थ आहेत, असा गैरसमज आहे. डोसा हा आरोग्यासाठी चांगला आहे आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे नाकारता येत नाही. पण, तो पचायला हलका पदार्थ नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी डोसा आणि इडली कमी प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.”

हेही वाचा : Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश

आंबवलेले पदार्थ खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

इडली किंवा डोसा बाहेर खाण्याऐवजी घरीच बनवा आणि खा. दुकानात मिळणारे इडली आणि डोशाचे पीठ चांगले नसते.” त्यात जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह्ज, मीठ किंवा साखर असते; ज्यामुळे पदार्थ खराब न होता, जास्त काळ आंबवले जातात. असे पदार्थ आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खावे,” असे धवन सांगतात.

तज्ज्ञ सांगतात की विशिष्ट अ‍ॅलर्जी, आहारात कमी मीठ घेणाऱ्या लोकांनी आंबवलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजेत आणि जर याच्या सेवनानंतर कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी दिसून आली, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.