फळांशिवाय आपला आहार पूर्ण होत नाही. फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे याची तुम्हाला कल्पना असेलच. निरोगी आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम राहण्यासाठी फळे आवर्जून खावीत, असा सल्ला डॉक्टर देतात. जर तुम्ही रोज पुरेशा प्रमाणात फळांचे सेवन केले, तर तुम्हाला आरोग्यविषयक अनेक फायदे मिळू शकतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व फायबरसह अनेक पोषक घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शारीरिक विकासासाठी आवश्यक आहेत. जी फळे आपण बाजारातून खरेदी करून आणतो, त्यांचे स्वच्छ धुतल्यानंतरच सेवन केले पाहिजे हे सर्वांनाच माहीत आहे.

शहरातील बाजारपेठांमध्ये फळे बाहेरून येत असतात. त्यामुळे ती ग्राहकांना विकली जाईपर्यंत त्यांच्यावर अनेक रासायनिक गोष्टींचा फवारा मारला जातो. बऱ्याच वेळा फक्त पाणी मारून अशा गोष्टी ताजी ठेवण्याचा वा तसे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावर धूळ अथवा हवेतील अनेक प्रदूषित घटक तसेच राहून जाण्याची शक्यता असते. बाजारातून आणलेली फळे साध्या पाण्यात धुतल्याने त्यावरील कीटकनाशके नष्ट होऊ शकतात. अॅव्होकॅडो हे अनेकांचे आवडते फळ आहे. ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असल्यामुळे अनेकांच्या आहारात या फळाचा समावेश असतो. परंतु, अॅव्होकॅडो कापण्यापूर्वी किंवा ते सोलण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ धुऊन घ्यायला हवे; अन्यथा आरोग्यविषयक समस्या उदभवू शकतात. याच विषयावर बंगळुरू येथील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Women Lost 63 kg Weight With Protein Intake And Sleep
६३ किलो वजन कमी करताना महिलेने काय खाल्लं? डॉक्टरांनीही सांगितलं रोजच्या जेवणातील ‘या’ घटकाचं महत्त्व
A hilarious answer written by a 5th student
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

(हे ही वाचा : तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या… )

चक्रवर्ती म्हणतात, “फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये विविध पोषक घटकांचा समावेश असल्याने लोक त्यांचा आहारात समावेश करतात. अॅव्होकॅडो हे अशा आरोग्यदायी फळांपैकी एक आहे. अॅव्होकॅडोमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करून ते नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. अॅव्होकॅडोच्या अनेक फायद्यांमुळे लोक त्याचा आहारात, विशेषत: सकाळच्या नाश्त्यामध्ये अॅव्होकॅडोचा समावेश केला जातो. अॅव्होकॅडोमध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, एनर्जी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशिमय, व्हिटॅमिन ए, बी६, सी, ई, के, थियामिन, कॉपर, झिंक इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळेच या फळाला ‘पॉवरहाऊस सुपरफूड’, असे म्हटले जाते. त्याशिवाय यामध्ये हेल्दी फॅट्स, अँटीएजिंग व अँटीऑक्सिडंट्स घटकही असल्याचे आढळते.”

अॅव्होकॅडो फळ नेहमी स्वच्छ धुऊन खाल्ले पाहिजे. अॅव्होकॅडोच्या आवरण वा सालावर साल्मोनेला व लिस्टेरिया यांसारखे हानिकारक जीवाणू असतात. त्यामुळे हे फळ नीट धुऊन न घेता कापायला घेतल्यास, त्याच्या सालावरील जीवजंतू चाकूवर आणि नंतर ते फळाद्वारे आपल्या पोटात स्थानांतरित होऊ शकतात. त्यामुळे मळमळ, उलट्या, जुलाब व ताप यांसारख्या लक्षणांसह आजार होऊ शकतात. निरोगी प्रौढ लोक मोठ्या समस्यांशिवाय त्यांच्याशी लढू शकतात; परंतु गर्भवती महिला, लहान मुले व कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना गंभीर गुंतागुंतीचे आजार होण्याचा धोका जास्त असतो, असेही चक्रवर्ती सांगतात.

चक्रवर्ती यांच्या मते, अॅव्होकॅडो धुण्याची साधी पद्धत खूपच प्रभावी आहे. तुम्ही आणलेल्या अॅव्होकॅडोवर मोठ्या प्रमाणात जीवाणू वा त्यावरील प्रदूषित घटक काढून टाकण्यासाठी ते कापण्यापूर्वी २०-३० सेकंद थंड पाण्याखाली स्वच्छ धुवा. धुण्यासाठी साबण किंवा कठोर डिटर्जंट्स वापरणे टाळा; ज्यामुळे अॅव्होकॅडो खराब होऊ शकते. धुतल्यानंतर स्वच्छ पेपर टॉवेलने अॅव्होकॅडो कोरडे करा आणि मगच सेवन करा.