scorecardresearch

Premium

नाश्ता केला नाही तर वजन वाढेल का? नाश्ता वगळण्याचा शरीरावर काय होतो परिणाम? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…

नाश्ता करणे आणि वजण नियंत्रित करणे यामधील संबध अनेक अभ्यासातून सिद्ध झाले, ज्यामध्ये नाश्ता न केल्याने विविध प्रकारचे परिणाम होऊ शरीरावर शकतात हे समोर आले आहे.

Will you gain weight if you don't eat breakfast
सकाळी नाश्ता का करावा? जाणून घ्या (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आरोग्य आणि तंदुरुस्त राहण्याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. या गैरसमजामुळे लोक नकळतपणे आरोग्यासाठी योग्य नसलेल्या मार्गाचा अवलंब करतात. असाच एक गैरसमज जो गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून आहे तो म्हणजे, ‘नाश्ता करणे ही वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. पण, हे प्रत्येक व्यक्तीच्या चयापचयाच्या शक्तीवर अवलंबून आहे”, असे मत मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना व्यक्त केले आहे.

सकाळी नाश्ता का करावा?

नाश्ता करणे आणि वजन नियंत्रित करणे यामधील संबंध अनेक अभ्यासातून सिद्ध झाले, ज्यामध्ये नाश्ता न केल्याने विविध प्रकारचे परिणाम शरीरावर होऊ शकतात, हे समोर आले आहे. सकाळी नाश्ता करण्यामागे असा सामान्य तर्क आहे की, ‘दिवसाच्या पहिल्या टप्प्यात अन्नाचे सेवन केल्याने जास्त वेळ पोट भरलेले राहते आणि दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला भूक लागत नाही. ‘तुम्ही दिवसभर पुरेल इतक्या कॅलरीजचे सेवन केल्यानंतर जास्त अन्न खाऊ नये, जेणेकरून तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता.

Stressed Out Is your gut trying to tell you something
तुमच्या तणावाचा आतड्याच्या आरोग्यावर होतो परिणाम? संशोधनाबाबत काय आहे डॉक्टरांचे मत…
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
Radical changes
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल! धातूऐवजी सिरॅमिक सांध्याचा वापर ठरेल फायद्याचा
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

नाश्ता न केल्यास व्यक्ती दिवसभरात जास्त प्रमाणात खातो का?

नाश्ता न केल्यास दिवसभरात जास्त प्रमाणात अन्न खाल्ले जाते, हा सामान्य समज सर्वांच्या बाबतीत लागू होत नाही. मानवी शरीर ही एक क्लिष्ट रचना आहे आणि प्रत्येक व्यक्तीची चयापचय प्रक्रिया आणि पचनाची प्रवृत्ती वेगळी असते. एका व्यक्तीसाठी जी गोष्टी फायदेशीर ठरू शकते ती दुसऱ्यासाठी तितकी फायदेशीर असणार नाही.प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होणाऱ्या वैयक्तिक फरकांना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे, पोषणासाठी अधिक वैयक्तिकृत दृष्टिकोन (a more personalized) स्वीकारणे ही मुख्य गोष्ट आहे.

हेही वाचा – सलग तीन दिवसांच्या उपवासाचा तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम?

प्रत्येक व्यक्तीची चयापचय आणि पचनक्रिया वेगवेगेळी असते
भिन्न व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे अन्न पचवतात आणि एकाच प्रकारच्या पौष्टिक आहारासाठी त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. काही लोकांना असे वाटते की, दिवसातील पहिले जेवण अथवा नाश्ता वगळल्याने त्यांच्या पचनसंस्थेला फायदा होतो, तर इतरांना नाश्ता केल्यामुळे चयापचय क्रियेत सुधारणा होण्यास मदत होते. नाश्त्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यापेक्षा, लोकांनी त्यांच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांच्या शरीराचे जैविक वेळापत्रक (circadian rhythms) लक्षात घेऊन त्यानुसार पूरक खाण्याच्या सवयी विकसित केल्या पाहिजेत.

नाश्ता न करणे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकत नाही

कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे आढळून आले की, नाश्ता न करणारे लोक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जास्त खात नाहीत आणि त्याऐवजी ते दिवसभरात सुमारे ४०० कमी कॅलरी खातात. म्हणून न्याहारी वगळणे तुम्हाला मधुमेह नसल्यास मदत करू शकते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची वाढ आणि विशिष्ट आरोग्य परिस्थिती टाळण्यासाठी अन्नाचे विभाजन करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, शरीराला अन्नाची गरज असल्यास ते तुम्हाला आठवण करून देईल आणि लवकर नाश्ता करताना असे होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येते.

हेही वाचा – पेपा पिग’, ‘कोको मेलन’ आणि ‘कार्टून मॅरथॉन’ पाहण्यामुळे तुमची मुलं ‘zombie’ झाली आहेत का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

चयापचय सुधारण्यासाठी काय आवश्यक आहे?

जर तुम्हाला चयापचय प्रक्रिया वाढवायची असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, “नाश्ता वगळणे किंवा नाश्ता वगळल्याने वापरलेल्या कॅलरींच्या संख्येवर कोणताही परिणाम होत नाही.” चयापचयासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात खाल्लेले एकूण अन्न, शरीराला आवश्यक असलेली कॅलरीची पूर्तता आणि शरीर वापरत असलेल्या कॅलरी तुम्ही कोणत्या वेळी किंवा किती वेळा खाता याने काही फरक पडत नाही. फॅट-स्टोअरिंग एंजाइमामुळे (Fat-storing enzymes) चयापचय न होण्याची समस्या वाढते, म्हणून शरीराची ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे.

शरीर वापरत असलेल्या कॅलरीजची संख्यादेखील तुमची शारीरिक हालचाल आणि तुम्ही स्नायू (muscle mass) तयार केले आहेत की नाही, यावर अवंलबून असते. फॅट्सपेक्षा स्नायू जास्त कॅलरीज वापरतात.

इंटरमिटेंट फास्टिंगचे परिणाम सिद्ध झाले आहेत

अलीकडेच इंटरमिटेंट फास्टिंगची संकल्पना लोकप्रिय झाली आहे, ज्याने पारंपरिक तीन वेळच्या जेवणाच्या दिनचर्येला आव्हान दिले आहे. यामध्ये लोक खाण्यात ठराविक काळाचा ब्रेक घेतात आणि बराच वेळ उपाशी राहतात. यासाठी १६.८ हा फॉर्म्युला वापरला जातो. त्यानुसार तुम्हाला १६ तास उपवास करायचा आणि ८ तासांनंतर खायचे-प्यायचे. या उपवासामध्ये खाण्याच्या वेळेवर मर्यादा घालणे आणि उपवासाचा कालावधी स्वीकारणे, काही लोकांना त्यांचे वजन नियंत्रित करण्यात आणि एकूणच बरे वाटण्यास मदत करू शकते. इंटरमिटेंट फास्टिंग करत असताना तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल तर तुमचे वजन हळूहळू कमी होऊ शकते. याचे कारण असे की, “जेव्हा जास्त कालावधीसाठी अन्न सेवन केले जात नाही, तेव्हा १६ तासांचा उपवासाचा कालावधी फॅट्स कमी करण्यास प्रोत्साहन देऊ शकतो.”ॉ

हेही वाचा – ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते का? संशोधनाबाबत काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या 

नाश्त्याच्या वेळी अन्नाचे अतिसेवन करू शकता
काहीवेळा, दिवसभर ऊर्जा टिकवण्याच्या नादात, भूक नसतानाही तुम्ही नाश्त्याच्यावेळी जास्त अन्न खाऊ शकता आणि साखरेने भरलेला एक मोठा ग्लास ज्यूस किंवा एक कप कॉफी आणि टॉपिंगमध्ये जास्त कॅलरीज खाता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will you gain weight if you dont eat breakfast what is the effect of skipping breakfast on the bod find out what nutritionists say snk

First published on: 30-11-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×