scorecardresearch

World Aids Day 2022: शरीरात HIV संक्रमण होताच दिसू लागतात ‘हे’ बदल; AIDS ची लक्षणे घरीच ओळखा

HIV / AIDS Symptoms and Causes: तुम्हाला माहित आहे का.. भारतात HIV व एड्सचे सर्वाधिक रूग्ण आंधप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र येथे आढळतात.

World Aids Day 2022: शरीरात HIV संक्रमण होताच दिसू लागतात ‘हे’ बदल; AIDS ची लक्षणे घरीच ओळखा
World Aids Day 2022: शरीरात HIV संक्रमण होताच दिसू लागतात 'हे' बदल (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

World Aids Day 2022, HIV / AIDS Awareness: जागतिक आरोग्य संघटेनच्या माहितीनुसार २०२१ पर्यंत जगभरात एचआयव्हीच्या तब्बल ३.८४ कोटी रुग्णांची नोंद झाली आहे. आजवरचे तपशील पाहता जगात सर्वात प्रथम १९८१ साली अमेरिकेत एड्सचा पहिला रूग्ण आढळला होता. भारतात मद्रासमध्ये १९८६ साली पहिला HIV बाधित रुग्ण आढळला होता तर मुंबई शहरात मे १९८६ साली पहिला एड्सचा रुग्ण आढळला होता. भारतात सर्वाधिक रूग्ण आंधप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र येथे आढळतात. दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवसानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, जेणेकरून या माध्यमातून सामान्य नागरिकांना एड्सचाप्रसार, लक्षण व उपचार यांविषयी माहिती मिळू शकते.

AIDS चे मुख्य टप्पे कोणते?

ह्युमन इम्युनो डिफिशियंसी व्हायरस म्हणजेच एचआयव्ही जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा हळूहळू शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. एचआयव्ही शरीरातून CD4 पांढऱ्या पेशी कमी करू लागतो व जेव्हा पांढऱ्या पेशींची संख्या ५००- १६०० वरती क्युबिक मिलीमीटर वरून २०० प्रति क्युबिक मिलीमीटर इतकी खाली येते तेव्हा एड्सचे निदान होते व या शेवटच्या टप्प्यात योग्य उपचार न घेतल्यास मृत्यूही होऊ शकतो.

‘या’ चुका ठरतात AIDS चे कारण

एड्ससंदर्भात आजही समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. सर्वात मुख्य म्हणजे एड्स हा केवळ असुरक्षित सेक्स केल्यानेच पसरतो असा अनेकांचा समज आहे, आजवर अनेक तज्ज्ञांनी हे वारंवार नमूद केले आहे की एड्स हा केवळ लैंगिक संबंधांनीच नव्हे तर नियमित आयुष्यातील काही चुकांमुळे सुद्धा होऊ शकतो. आपण घरात किंवा सलूनमध्ये केस कापायला, दाढी करायला वापरण्यात येणारा ब्लेड नीट तपासून न घेतल्यास एड्सचा धोका वाढू शकतो. डॉक्टरकडे इंजेक्शनसाठी वापरलेली किंवा कपडे शिवण्यासाठी वापरण्यात येणारी सुई किंवा पिन नीट तपासून न घेतल्यास याचा थेट रक्ताशी संपर्क होत असल्याने धोका बळावू शकतो.

एड्सची सुरुवात ही एचआयव्हीचे शरीरात संक्रमण होण्यापासून होते त्यामुळे अन्य कोणताही व्हायरल शरीरात जाताच दिसणारी लक्षणे दिसू शकतात. यात मुख्यतः खालील लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक असते.

एचआयव्ही संक्रमणाची लक्षणे काय?

 • ताप
 • थंडी भरून येणे
 • कित्येक आठवड्यापासून ताप येणे
 • कित्येक आठवडे खोकला असणे
 • विनाकारण वजन कमी होणे
 • तोंड येणे
 • भूक न लागणे, अन्नावरची वासना नाहीसी होणे
 • सतत जुलाब होणे
 • झोपताना घाम येत राहणे
 • अंगदुखी
 • गळ्याला सूज येणे
 • त्वचेवर चकत्यांसारखे डाग येणे
 • पोट सतत बिघडणे

AIDS ची लक्षणे

 • सतत ताप येणे
 • काखेच्या जवळ, मानेजवळ, जांघांच्याजवळ सूज येणे
 • नेहमी थकवा जाणवणे
 • तोंड-नाक व पापण्यांजवळ त्वचा काळी पडणे
 • गुप्तांगाजवळ जखम जाणवू शकते.
 • सतत लक्ष विचलित होणे

दरम्यान, एड्सबाबत एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे HIV / AIDS हा रोग संसर्गजन्य रोग नाही आहे म्हणून बाधित रूग्णासह राहताना, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, कपडे वापरणे, बाजूला झोपणे, शौचालयाचा वापर करणे या सगळ्या कारणामुळे या रोगाची लागण होत नाही.

(टीप: वरील लेख हा प्राप्ती माहितीवर आधारित आहे, अशी लक्षणे दिसल्यास न घाबरता वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 07:00 IST

संबंधित बातम्या