World Sleep Day 2023: प्रत्येक माणसाला निरोगी राहण्यासाठी एका दिवसातील २४ तासांपैकी किमान सात ते आठ तास विश्रांती घेणे आवश्यक असते. झोप घेतल्याने थकवा दूर होतो. निद्राचक्र पूर्ण झाल्याने शरीराची वाढ होण्यास मदत होते. बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागू शकतो. झोप पूर्ण न झाल्याने शारीरिक, मानसिक स्वास्थ बिघडू शकते. झोपेचे महत्त्व आणि त्याच्या मानवी शरीरावर होणारा परिणाम याविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी ‘वर्ल्ड स्लीप डे’ (World sleep day) साजरा केला जातो.

रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्त झाल्यावर लगेच रात्रीचे जेवण जेवण्याचा सल्ला दिला जातो. जेवल्यानंतर शरीरामध्ये पचनक्रिया सुरु होते. अशा वेळी जेवण केल्यावर लगेच झोपल्याने त्याचा परिणाम निद्राचक्रावर आणि पचनक्रियेवर होऊ शकतो. दिवसभर काम केल्यानंतर शरीराला अन्न आणि विश्रांती या दोन्हींची गरज भासते. स्वास्थ जपण्यासाठी या दोन्हींमध्ये ताळमेळ असणेही फायद्याचे असते. आत्मांतन वेलनेस सेंटरच्या डॉ. मनोज कुत्तेरी यांनी एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आहार आणि जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे या विषयी माहिती दिली आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

कॅफिनचे सेवन कमी करावे.

दिवसभर शरीरामध्ये तरतरी राहावी यासाठी काही लोक सकाळी उठल्या-उठल्या कॉफी घेतात. कॉफी व्यतिरिक्त इतर पदार्थांमध्येही कॅफिन मुबलक प्रमाणामध्ये असते. कॅफिन हे एक उत्तेजक आहे. हा पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचे पचन होण्यासाठी किमान ९-१० तास लागतात. तसेच ते रक्तामध्ये दीर्घकाळापर्यंत टिकू राहते. संध्याकाळ झाल्यानंतर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो आणि रात्री झोप पूर्ण न झाल्याने निद्राचक्र बिघडू शकते.

आणखी वाचा – मासिक पाळीदरम्यान आणि आधी तुम्हाला तीव्र डोकेदुखी होतेय का? या आजाराचे असू शकते लक्षण

नियमितपणे व्यायाम करणे.

गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाले आहेत. करोना काळात लोकांना घरात बसून राहायची सवय लागली आहे. लोक तासनतास एका जागेवर बसून असतात. बऱ्याच जणांची व्यायाम करायची सवय सुटली आहे. व्यायाम, शारीरिक हालचाली यांचा आणि निद्राचक्राचा जवळचा संबंध आहे. नियमित व्यायामाची सवय असल्याने शरीरामधील एंडोर्फिन आणि सेरोटोनिन सारख्या इतर न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनास उत्तेजन मिळते. चिंता, ताणतणाव दूर होण्यासाठीही व्यायामाची मदत होते. गाढ झोप लागावी यासाठी व्यायाम करणे फायदेशीर असते. परंतु अतिव्यायाम आणि रात्री उशिरा व्यायाम केल्याने त्रास होऊ शकतो.

संतुलित आणि योग्य आहार घेणे.

आहारामध्ये ट्रान्स-फॅट्स, साखर अशा पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. संतुलित आहार न घेतल्यास पचनाची प्रक्रिया मंदावते. अशा वेळी पोटामध्ये जळजळ होऊ शकते. चुकीच्या वेळी जेवण करणे, संतुलित आहार न घेणे यामुळे वजनही वाढू शकते. याचा परिणाम प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्षपणे शरीरावर होत असतो. योग्य आहार न घेतल्याने रात्री-अपरात्री जाग येऊन झोप मोड होऊ शकते. शरीरासाठी आवश्यक असलेल्या संतुलित आहाराविषयी तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करुन यामध्ये योग्य बदल करु शकता.

आणखी वाचा – …म्हणून ताप येणे फायद्याचे ठरू शकते! शरीरात तापाने कसा बदल होतो सांगणारा रिसर्च एकदा वाचाच

याव्यतिरिक्त अल्कोहोलचे कमी प्रमाणात सेवन करणे, झोपेचे योग्य पद्धतीने नियोजन करणे, घरामध्ये स्वच्छता राखणे अशा साध्या सवयीमुळेही निद्राचक्र सुधारण्यास मदत होते.