World Tuberculosis Day 2023 : क्षयरोग हा एक गंभीर जीवाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे आपल्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो. हा अत्यंत संसर्गजन्य रोग असल्याने किडनी, हाडांचे सांधे, मेंदू, मणका, ह्रदयाचे स्नायू आणि गळ्यातील स्नायूंवरही गंभीर परिणाम होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, क्षयरोग हा जीवाणूंमुळे होतो ( मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस) ज्याचा थेट गंभीर परिणाम फुफ्फुसांवर होतो. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेले लोक खोकतात, शिंकतात किंवा थुंकतात तेव्हा हा रोग हवेत पसरतो, यानंतर एखाद्या निरोगी व्यक्तीच्या श्वासवाटे हे जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करतात. दरवर्षी सुमारे १० मिलियन लोक क्षयरोगाने आजारी पडतात. पण हा आजार बरा होण्याजोगा आहे. पण जगातील अनेकांना हा आजार मृत्यूच्या दारात घेऊन जात आहे.
क्षयरोग हा अँटीबायोटिक्स आणि काही ठरावीक उपचार पद्धतीने बरा करता येतो, पण तरीही जगात १.५ मिलियम लोग या आजाराने मरण पावतात. क्षयरोगाचे वेगवेगळे टप्पे आहेत. ज्यामुळे संसर्गाची तीव्रता आणि लक्षणे सहन ओळखता येतात.
क्षयरोग झाला कसा ओळखायचा?
क्षयरोग हा इतर फ्लू इतकाच संसर्गजन्य आजार आहे. जेव्हा कोणी व्यक्ती शिंकते, खोकते किंवा उघड्यावर थुंकते तेव्हा ते जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात श्वासावाटे, स्पर्शावाटे प्रवेश करतात. यामुळे क्षयरोग नसलेल्या व्यक्तीला याचा धोका निर्माण होतो. मायोक्लिनिकच्या मते, क्षयरोगाचे प्रामुख्याने तीन टप्पे असतात आणि प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी लक्षणे असतात.
संसर्गाचा पहिला टप्पा
प्राथमिक टप्प्यात क्षयरोगाचे जंतू रोगप्रतिकारक शक्तीवर प्रवेश करतात. पण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर ती व्यक्ती यशस्वीरित्या या आजाराशी लढा देऊ शकते. वेळीच उपचार केले तर व्यक्ती जिवंत राहू शकते. संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात ताप, थकवा, खोकला, शिंकणे यासारखी फ्लूसारखी लक्षमे दिसतात.
संसर्गाचा दुसरा टप्पा
संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात जंतूचा आधीच शरीरात प्रवेश झालेला असतो. यावेळी आपली रोगप्रतिकारक शक्तीने शरीरात आधीच फायरवॉल तयार केलेली असते. हे क्षयरोगाचे जंतू शरीरावर खरोखर परिणाम करण्याच्या तयारीत असतात, पण त्वचा चाचणी किंवा एक्सरेच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जाऊ शकतो. त्याची कोणतीही खरी लक्षणे नाहीत
संसर्गाचा तिसरा टप्पा
संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणाचा प्रसार नियंत्रित करू शकत नाही. पहिल्या टप्प्यात लक्षणे न ओळखल्यास काही महिन्यांनी याचा संसर्ग वाढू शकतो. तिसऱ्या टप्प्यात ही लक्षणं अधिक सक्रिय जाणवतात. पण वेळीच उपचार करून तुम्ही हा संसर्ग रोखू शकता.
क्षयरोगाची लक्षणे
१) खोकल्यातून रक्त येणे
२) छातीत दुखणे
३) श्वास घेताना किंवा खोकताना वेदना होणे
४) ताप
५) थंडी वाजणे आणि रात्री घाम येणे
६) वजन कमी होणे
७) भूक न लागणे
८) थकवा आणि उदासपणाची सामान्य भावना
एक्स्ट्रापल्मोनरी टीबी: जेव्हा सक्रिय क्षयरोग फुफ्फुसाबाहेर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरतो तेव्हा असे होते. याला एक्स्ट्रापल्मोनरी ट्यूबरक्युलोसिस म्हणतात. या टप्प्यात संपूर्ण शरीरात संसर्गाचे गंभीर परिणाम दिसू लागतात. अनेकदा उपचार करुनही यात संसर्ग पूर्णपणे बरा होण्याची शक्यता फार कमी असते.