देशात इन्फ्लूएंझा अर्थात H3N2 व्हायरसच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. या व्हायरसच्या संसर्गामुळे सर्दी, घसा खवखवणे, खोकला आणि नाक वाहणे ही सामान्य लक्षण आढळतात. यात अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत इन्फ्लूएंझा व्हायरसविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या रोजच्या आहारात अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ने समृद्ध पदार्थांचा समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करा.

अयोग्य आहारामुळे व्हायरसच्या संसर्गाची तीव्रता आणि कालावधी वाढू शकतो. मात्र रोज संतुलित आहार घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते शिवाय संसर्गाचे व्यवस्थापन करता येते. फरीदाबादमधील एशियन हॉस्पीटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ कोमल मलिक यांनी इन्फ्लूएंझा व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याची माहिती दिली आहे, जाणून घेऊ…

Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

अँटिऑक्सिडंट समृद्ध अन्न

ताजी फळे आणि भाज्या यांसारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करा. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, झिंक, व्हिटॅमिन ए आणि सेलेनियम असलेली फळं म्हणजे बेरी, किवी आणि लिंबूप्रमाणे आंबट फळे खाऊ शकतात.

धान्य आणि डाळी

इन्फ्लूएंझा संसर्गातून बरे होत असताना शरीराला उर्जेची गरज असते. यासाठी व्हायरस विरोधात लढण्यासाठी आहारात धान्यांचा समावेश करा. या धान्यांमध्ये बाजरी, क्विनोआ, तपकिरी तांदूळ, लाल तांदूळ, दलिया आणि मक्याचा समावेश करा. याशिवाय काही डाळींच्या सेवनामुळेही लवकर बरे होण्यास मदत होते.

अँटी मायक्रोबियल फूड्स

अदरक सारखे अँटी मायक्रोबियल फूड्सचा तुमच्या आहारात किंवा चहामध्ये समावेश करा. याशिवाय विविध औषधी वनस्पती, मसाले आणि लसूण या पदार्थांचा भाज्या शिजवताना वापर करावा.

प्रोसेस्ड फूड टाळा

प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याऐवजी ताजे शिजवलेले अन्न खा. मद्यपान, धूम्रपान आणि कार्बोनेटेड, एरेटेड पेय टाळा. भरपूर ट्रान्स फॅट्स असलेले डीप फ्राइड केलेले पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी आणि हार्बल चहा यांसारखे भरपूर द्रवपदार्थांचे सेवन करुन तुम्ही कोणत्याही संसर्गापासून बरे होऊ शकतात.

दही आणि फळांवर आधारित पेय

फळांवर आधारित पेय बनवा आणि त्यात चिया आणि भोपळ्याच्या बिया घालून ते पिऊ शकता. याशिवाय दहीपासून बनवलेली स्मूदी खाऊनही तुम्ही आहारातील पौष्टिक मूल्ये वाढवू शकता.

हलके शिजवलेले सॅलड

कच्चे सॅलड खाऊ नका. त्याऐवजी भाज्या हलक्या परतून घ्या आणि त्यात थोडे लसून घालून सॅलड तयार करा. तुम्ही आहारात भाजी, चपाती, भात, डाळीसोबत हलके शिजवलेले सॅलड देखील खाऊ शकता. यामुळे बरे तर वाटेलचं पण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होईल.