How to get rid of gas naturally: पोटफुगी ही आजकालच्या सर्वांत सामान्य पचन समस्यांपैकी एक बनली आहे. बदलती जीवनशैली, अनियमित खाण्याच्या सवयी व वाढता मानसिक ताण यांमुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे. पूर्वी या समस्येचा त्रास अधूनमधून होत होता; पण आता लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात बद्धकोष्ठता, गॅस, जडपणा आणि आजारपणाच्या तक्रारी करू लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, पोट फुगण्याचा त्रास हा केवळ जास्त खाण्यामुळे होत नाही, तर तो तुम्ही काय खाता, कसे खाता आणि कोणत्या मानसिक स्थितीत खाता, या तिन्ही गोष्टींच्या थेट पचन स्थितीवर अवलंबून असतो. फास्ट फूड, प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर, परिष्कृत कार्बोहायड्रेट्स व फायबरची कमतरता यांमुळे आतड्यांतील जीवाणूंचे संतुलन बिघडते.
लखनऊ येथील आरोग्य व कल्याण प्रशिक्षक कपिल कनोडिया यांनी एका व्हिडीओद्वारे पोट फुगण्याची आठ मुख्य कारणे स्पष्ट केली आहेत आणि त्यांचे सोपे उपायदेखील सांगितले आहेत. कपिल यांच्या मते, जर सामान्यत: दैनंदिन आहाराच्या सवयी संतुलित नसतील, तर त्या पोटफुगीस कारणीभूत ठरू शकतात. चला, पचनक्रियेच्या बिघाडास कारण ठरणाऱ्या आहारातील चुका कोणत्या ते पाहूयात.
पचन बिघडण्याची कारणे
या समस्येमध्ये बिघडलेल्या जीवनशैलीचे घटकदेखील भूमिका बजावतात. जास्त वेळ बसून राहणे, शारीरिक हालचालींचा अभाव व कमी झोप यांमुळे पचनक्रिया मंदावते. त्याव्यतिरिक्त दीर्घकालीन ताणामुळे कॉर्टिसोल हा तणाव संप्रेरक वाढतो, जो पचन प्रक्रिया मंदावतो. म्हणूनच ताणतणावाच्या काळात गॅस, आम्लपित्त व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या अधिक सामान्यपणे होत असतात.
डॉक्टर म्हणतात की, जर पोट फुगणे अधूनमधून होत असेल, तर ते सामान्य असू शकते; परंतु जर ही समस्या वारंवार होत असेल, तर पोट दररोज जड राहते किंवा खाल्ल्यानंतर अस्वस्थता कायम राहते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. आहार आणि जीवनशैलीत वेळेवर बदल करून, बहुतेक प्रकरणांमध्ये औषधांशिवायही पोटाचे आरोग्य सुधारता येते.
जास्त किंवा कमी फायबरच्या सेवनामुळे पोटफुगीची शक्यता
पचनासाठी फायबर आवश्यक आहे, परंतु असंतुलनामुळे पोटात अस्वस्थता वाढू शकते. खूप कमी फायबर सेवन केल्याने आतड्यांची हालचाल मंदावते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटफुगी होते. दरम्यान, अचानक किंवा जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने आतड्यांमधील वायू तयार होऊ शकतो, कारण आतड्यातील बॅक्टेरिया फायबरला आंबवतात; यामुळे पोटात जडपणा, घट्टपणा आणि फुगण्याची भावना येऊ शकते, म्हणून फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवावे आणि शरीराच्या प्रतिसादाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
जास्त किंवा कमी पाणी प्यायल्याने आतड्यांचे आरोग्य बिघडण्याचा संभव
पचनसंस्थेसाठी पाणी आवश्यक आहे, परंतु त्याचे प्रमाण संतुलित असले पाहिजे. खूप कमी पाणी प्यायल्याने फायबर योग्यरित्या काम करू शकत नाही, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगी होते. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होऊ शकतो, ज्यामुळे अन्न योग्यरित्या पचत नाही आणि पोट फुगल्यासारखे वाटू शकते. तज्ज्ञांच्या मते, आतड्यांचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी हवामान, शारीरिक हालचाली आणि आहारानुसार तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचे प्रमाण समायोजित केले पाहिजे.
जलद जेवणे आणि जास्त खाणे यामुळेही समस्या वाढते.
तज्ज्ञ म्हणतात की, लोक अनेकदा भरभर ज्यामुळे त्यांना गॅसची समस्या होते. शिवाय, जास्त खाल्ल्याने पोटावर दबाव वाढतो. तज्ज्ञ तुमच्या पोटाच्या क्षमतेच्या फक्त ७०% जेवणे आणि हळूहळू आणि काळजीपूर्वक चावणे असा सल्ला देतात, यामुळे आम्लता आणि पोटफुगी दोन्ही कमी होण्यास मदत होते.
रात्री उशिरा जेवणे आणि शरीराची हालचाल कमी होणे
तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे उशिरा जेवण आणि शरीराची कमी हालचाल पचनक्रिया मंदावण्यास कारणीभूत. बरेच लोक दररोज एक तास व्यायाम करतात; परंतु उर्वरित वेळ ते बसून राहतात. त्यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि पोट फुगण्याची समस्या वाढते.

