आरोग्यवार्ता : वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल आवश्यक

मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांचा धोक हा केवळ यामुळे अधिक असल्याचे संशोधक सांगतात.

fat
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांचा धोक हा केवळ यामुळे अधिक असल्याचे संशोधक सांगतात. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे आता तर लहान मुलांनाही या समस्येने ग्रासलेले दिसते. यावर मात करण्यासाठी अनेक जण औषधांचे सेवन करतात; परंतु संशोधनानुसार अशा औषधांपेक्षा जीवनशैलीतील बदल हा महत्त्वाचा घटक ठरतो.

लठ्ठ व्यक्तींनी औषधांबरोबर जीवनशैलीत बदल केला तर तीन ते पाच वर्षांत सरासरी १०.६ टक्के वजन कमी होते, असे एका संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. औषधे न घेताही फक्त जीवनशैलीत बदल केल्यासही वजन कमी करणे शक्य आहे, असेही या संशोधनात स्पष्ट झाले. अमेरिकेतील वेट मॅनेजमेंट सेंटरने ४२८ रुग्णांची माहिती गोळा केली. या संशोधनानुसारही जीवनशैलीत बदल करून वजन कमी करणे अशक्य नाही. औषधे ही मधुमेह आणि लठ्ठपणासंबंधी आजार कमी करण्यास मदत करू शकतात. न्यूयॉर्क येथील संशोधक मायकल एवीन्ट्राब यांनीही जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहारामुळे वजन कमी करण्याकडे लठ्ठ व्यक्तींनी लक्ष देणे हिताचे ठरेल, असे नमूद केले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Healthnews lifestyle changes are needed to lose weight ysh

Next Story
घरच्याघरी बनवा कोकोनट सूप नूडल्स; जाणून घ्या कसे बनवायचे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी