आरोग्यवार्ता : ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यात घट

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात १० पैकी एका व्यक्तीला त्याच्या जीवनकाळात कर्करोग होण्याची शक्यता असते.

आरोग्यवार्ता : ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यात घट
ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतील(फोटो: प्रातिनिधिक)

नवी दिल्ली : शरीरात अनियंत्रित स्वरूपात कोशिका वाढल्यानंतर कर्करोग होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात १० पैकी एका व्यक्तीला त्याच्या जीवनकाळात कर्करोग होण्याची शक्यता असते. हा आजार प्राथमिक अवस्थेत असताना बरा होण्याचे प्रमाण अधिक असते; परंतु दीर्घकाळानंतर तो धोकादायक होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार करणे आवश्यक आहे.

आहारात बदल आवश्यक 

कर्करोगाबद्दल विशेषत: स्तनाच्या कर्करोगाबाबत मोठय़ा प्रमाणात संशोधन झाले आहे. यामधील एका नव्या संशोधनानुसार ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे या प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. समुद्रातील अन्नामध्ये (सी फूड) ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्याचा आहारात समावेश केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. या संशोधनात १६०० जणांना सहभागी करण्यात आले होते. त्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही, हे स्पष्ट झाले. या आहारामुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो. त्याचबरोबर या आहारात तणाव कमी करणाऱ्या अ‍ॅटी इम्प्लेमेटरी गुणांचा समावेश असतो. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड पचनानंतर एंडोकॅनाबिनॉयड मॉलिक्यूल ईडीपी इए या रसायनात परावर्तित होतो. हे रसायन कर्करोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आहारात समुद्रातून मिळणाऱ्या अन्नाबरोबरच कर्करोग रोखण्यासाठी मदत करणाऱ्या चिया बीज, आळसीचे बीज, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल आदींचा आहारात समावेश करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Narali Purnima 2022 : कोळी बांधवांचा उत्साह शिगेला; नारळी पौर्णिमेचा सण दणक्यात होतोय साजरा; जाणून घ्या दिवसाचे महत्त्व
फोटो गॅलरी