scorecardresearch

आरोग्यवार्ता : इंजेक्शनची भीती कमी करणे शक्य

इंजेक्शनचा विचार मनात आला तरी मुलांच्या चेहऱ्यावर भीती दिसते. काही तर रडू लागतात किंवा इंजेक्शन नाकारण्यासाठी कारणे शोधतात.

आरोग्यवार्ता : इंजेक्शनची भीती कमी करणे शक्य
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : इंजेक्शनचा विचार मनात आला तरी मुलांच्या चेहऱ्यावर भीती दिसते. काही तर रडू लागतात किंवा इंजेक्शन नाकारण्यासाठी कारणे शोधतात. सध्या लसीकरणाचे महत्त्व वाढले असताना मुलांमधील ही भीती दूर करण्यासाठी प्राथमिकता देण्यात येत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ दक्षिण ऑस्टेलियाने यासंबंधी केलेल्या संशोधनानुसार मुलांमधील लसीकरण आणि इंजेक्शनची असलेली भीती कमी करता येते.

आठ ते १२ या वयोगटातील मुलांचा सहभाग असलेल्या अभ्यासानुसार यासाठी सकारात्मक संदेश देणे आणि मानसिक आधार आवश्यक आहे. तसेच इंजेक्शन देताना मुलांचे लक्ष अन्य बाबींकडे वळविण्याची क्लृप्ती वापरता येते. मुलांबरोबर सकारात्मक संवाद साधत इंजेक्शनच्या सुईची भीती दूर करता येते, असेही या अभ्यासात नमूद केले आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार करोनामुळे लसीकरण मोहीम सर्वदूर पोहोचवणे आणि अधिकाधिक मुलांना जोडणे हे भविष्यातील संकट कमी करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी मुलांमधील इंजेक्श्नची भीती दूर करणे आवश्यक आहे. इंजेक्शन आणि लसीकरणाबद्दल लहानपणी मनात तयार झालेले भय तरुणपणी किंवा त्यानंतरच्या काळातही कायम राहण्याचा धोका असतो. साथीच्या काळात अशा प्रकारचे अडथळे निर्माण झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही शास्त्रज्ञांना वाटते. या अभ्यासात ४१ मुलांसह त्यांच्या आई-वडिलांनी सहभाग घेतला होता. त्यांचे चार गटांत विभाजन करण्यात आले होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Healthnews possible reduce fear injection children vaccination ysh

ताज्या बातम्या