पौष्टिक आणि संतुलित आहार कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य राखण्यात मोठी भूमिका बजावतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पौष्टिकतेची कमतरता आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे जुनाट आजार आणि लठ्ठपणाचे एक सामान्य कारण आहे.

पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ तन्वी तुतलानी यांनी यावेळी सांगितले की, “आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आणि शरीराला रोग आणि इम्युनोडेफिशियन्सी समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते.” व्हिटॅमिन डी हा एक महत्त्वाचा सूक्ष्म पोषक घटक आहे जो सामान्य रोगप्रतिकारक शक्ती, हाडे आणि दातांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेह, हृदयविकार, वजन वाढणे, स्वयंप्रतिकार विकार, न्यूरोमस्क्युलर रोग, फ्लू, ऑस्टिओपोरोसिस, कर्करोग इत्यादी आजारांचा धोका असतो. आपल्याला सूर्यापासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळत असल्याने त्याला सनशाईन व्हिटॅमिन डी असेही म्हणतात. मात्र काही पदार्थ आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी पोहोचवू शकतात. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घेऊयात.

मशरूम

मशरूम हे व्हिटॅमिन डी २, डी ३ आणि डी ४ चे प्रमुख स्त्रोत आहेत. मशरूम देखील सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात असताना व्हिटॅमिन डीचे संश्लेषण करतात. शरीराची व्हिटॅमिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून किमान चार वेळा मशरूमचा आहारात समावेश करावा.

गाईचे दूध

गाईच्या दुधात सामान्यतः व्हिटॅमिन डी असते. त्याचे प्रमाण ब्रँडनुसार भिन्न असू शकते. दूध अधिक पौष्टिक बनवण्यासाठी बहुतेक दूध उत्पादक दूध प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म पोषक घटक जोडतात. दुधात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी नसले तरी त्यात कॅल्शियम भरपूर असते.

चीज

चीज हे जगभरातील सर्वात प्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. चीजमध्ये व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असते. तसेच चीजमध्ये भरपूर प्रमाणात फॅट देखील असते म्हणून पौष्टिक संतुलन राखण्यासाठी ते मध्यम प्रमाणात असल्याची खात्री करा.

दही

दही हा एक सोपा आणि सोयीस्कर खाद्यपदार्थ आहे. जो केवळ आतड्यांच्या आरोग्यासाठीच नाही तर हाडांसाठीही उत्तम आहे. फोर्टिफाइड दह्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीच्या दैनंदिन गरजेपैकी १०-२०% भाग पूर्ण होण्यास मदत होते. तसेच अनेक प्रकारच्या दह्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हे लक्षात ठेवा.

लोणी

लोणीमध्ये केवळ अँटिऑक्सिडंट्स, खनिजे, फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी देखील असते. एक चमचा लोणी व्हिटॅमिन डीच्या रोजच्या सेवनाच्या अंदाजे ११% भाग घेऊ शकते. जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होत असेल तर लोणीचे सेवन टाळा.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)