Eating fennel seeds after meals: दिवसभराच्या धावपळीनंतर प्रत्येकाला शांत झोप हवी असते. झोप ही आपल्या दैनंदिन जीवनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. झोप पूर्ण झाल्यावर शरीर, मन ताजेतवाने राहते. मात्र, अनेक वेळा झोप पूर्ण झाल्यानंतरही शरीरात थोडीशी सुस्ती राहते. काही जणांना झोपण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशा वेळी चांगली झोप येण्यासाठी काही जण मेलाटोनिनच्या गोळ्यांवर अवलंबून राहतात; तर काही जण झोपण्याच्या तीन तास आधी रात्रीचे जेवण करणे, थोडा वेळ चालणे किंवा ध्यान करणे यावर भर देतात. मात्र, अनेकांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे अनेकांना या गोष्टी करण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यांना रात्री गाढ झोप लागण्यासही अडचण येते.
तुमच्या व्यग्र जीवनशैलीमुळे तुम्हाला या नियमांचे पालन करणे शक्य होत नसेल, तर काळजी करू नका. या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थाबद्दल सांगत आहोत, जो तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत करू शकतो.
जेवणानंतर ही एक गोष्ट खा
बहुतेक लोक रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड खाणे पसंत करतात किंवा ते दूध किंवा सुका मेवा खातात. परंतु, तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. बडीशेप ही एकमेव गोष्ट आहे, जी तुम्हाला शांत आणि आरामदायी झोप मिळवून देण्यास मदत करू शकते. बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत.
जेवणानंतर अनेक जण आवर्जून बडीशेप खाणे पसंत करतात. खालेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी बडीशेप उपयुक्त असते. मात्र, बडीशेप आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारींवर फायदेशीर असते. अन्नपदार्थांची चव वाढविण्यासाठीही बडीशेप खातात. त्यामध्ये आरोग्याला उपयुक्त असणारे अनेक घटक असतात. त्यात तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, मँगनीज, मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक यांचा समावेश असतो.
झोप सुधारते : बडीशेप खाल्ल्याने गॅस आणि आम्लपित्तामध्ये मदत होते. काही लोकांना रात्रीच्या जेवणानंतर गॅस आणि आम्लपित्ताचा त्रास होतो. बडीशेपचे सेवन केल्याने आराम मिळू शकतो. बडीशेप गॅस्ट्रिक एंझाइम्स तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. त्याशिवाय बडीशेपमधील बीटा-अमिनो झोप आणणारे हार्मोन बीटा-अमिनो तयार करण्यासदेखील मदत करते, ज्यामुळे झोप लागण्यास मदत होते.
तणावाची पातळी कमी करते : अनेक लोकांना रात्री तणाव जाणवतो. अशा परिस्थितीत बडीशेप फायदेशीर ठरू शकते. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक फायटोकेमिकल्स असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला आराम वाटतो आणि रात्री शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते.
विषहरण : रात्री बडीशेप खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. विषहरणामुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि त्वचा निरोगी राहते. तसेच, सकाळी तुम्हाला ताजेतवाने वाटते.
