Rice And Cholesterol Connection : आजकाल हृदयाशी संबंधित आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे. या आजारांमागे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढणे हे एक मुख्य कारण असू शकते. वाईट कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होतात, ज्यामुळे रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. याच विषयावर आहारतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
भात खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढते का?
भात खाल्ल्याने वजन वाढू शकते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर) अचानक वाढू शकते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना कमीत कमी भात खाण्याचा सल्ला दिला जातो.
भात खाण्याचा कोलेस्ट्रॉलच्या पातळीवरही परिणाम होतो का?
तज्ज्ञांच्या मते, भातामध्ये फायबर कमी आणि कर्बोदके जास्त असतात. मात्र, भात खाण्याचा कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर थेट असा कोणताही मोठा परिणाम होत नाही. तरीसुद्धा, अतिप्रमाणात भात खाल्ल्याने पचनक्रिया (मेटाबॉलिझम) मंदावू शकते, ज्याचा परिणाम वजन, लठ्ठपणा आणि हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो.
भातामध्ये अशी काही जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि पोषक घटक असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण तरीही त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास काय करावे?
जर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असेल, तर पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस (Brown Rice) किंवा भरड धान्यांचा (मिलेट्स) आहारात समावेश करावा. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, तसेच वजन आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे तसेच नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचालींवर भर देणे गरजेचे आहे. जर तुमच्या वैद्यकीय तपासणीत कोलेस्ट्रॉल वाढल्याचे आढळले असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब आहारात योग्य बदल करायला सुरुवात करा.
