Healthy Lifestyle : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण हल्ली आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात वजन वाढीची समस्या तर सर्वात जास्त आहे. तुमचे सुद्धा वजन वाढले आहे का? किंवा पोटाची चरबी वाढली आहे का? जर हो आणि तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आज आपण वजन किंवा पोटाची चरबी सहज कमी करण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत. इन्स्टाग्रामवर फॅमिली फिजिशियन, हेल्थकोच डॉ. हर्षाली मालवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वजन किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी सहा सोपी मार्ग सांगितले आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
वजन/पोटाची चरबी सहज कमी करण्यासाठी ६ मार्ग –
१. सध्याकाळी ७ नंतर काहीही खाणे टाळा
२. आपल्या दिवसाची सुरुवा apple cider vinegar घेऊन करा
३. आहारात हाय प्रोटिन असणारे पदार्थ घ्या.
४. रिफाइन्ड साखर व मैदा पूर्णपणे बंद करा
५. योगा व मेडिटेशनच्या मदतीने ताण/तणाव कमी करा.
६. ही होमिओपॅथिक औषध पोटाची हट्टी चरबी कमी करण्यास मदत करते.
पाहा व्हिडीओ
dr.harshalikalamkarmalvi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वजन व पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सहा मार्ग खूप फायदेशीर आहे –
संध्याकाळी सात नंतर काहीही खाणे टाळा यांनी तुम्ही खाल्लेले अन्न झोपण्या अगोदर पचायला वेळ मिळेल आणि तुमचा मेटाबोलिझम फास्ट होईल आणि तुमची चरबी कमी करण्यास मदत होईल. रोज सकाळी अॅप्पल साइडर विनेगर घेतल्या मुळे मेटाबोलिजम बूस्ट होतं आणि पचनशक्ती चांगली होते. आहारात प्रोटीन युक्त पदार्थ जास्त घेतल्यामुळे इन्सुलिन स्पाईक होत नाही आणि त्याच्यामुळे वजन वाढत नाही. प्रोटीन युक्त पदार्थांसाठी तुम्ही मोड आलेली कडधान्ये व पनीर, अंडी, बदाम, सोयाबीन चंक्स घेऊ शकता. Refined साखर व मैदा याचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे याच्यात भरपूर कॅलरीज असतात त्याच्यामुळे वजन वाढते व जर तुम्ही हे खात असणार आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असणार तर लवकर वजन कमी होत नाही. Yoga व Meditation मुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते. Stress मुळे Cortisol नावाचा हार्मोन सिक्रेट होतं आणि त्यामुळे पोटाची चरबी वाढते आणि वजन सुद्धा वाढते. Phytolacca Berry हे एक होमिओपॅथिक औषध आहे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. अतिरीक्त वजन कमी करण्यासाठी आणि चरबीचे चयापचय वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. हे नैसर्गिकरित्या पचन प्रभावित करून भूक कमी करते. हे खाल्लेले अन्नाचे योग्य शोषण सुनिश्चित करते आणि कमी अन्न सेवन केल्यामुळे होणारी हायपर ॲसिडिटी आणि कमकुवतपणा कमी करते.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.