scorecardresearch

मिल्कशेक पिऊन कंटाळा आलाय? घरच्या घरी अगदी काही मिनिटांमध्ये बनवा हे ५ हेल्दी स्मूदी; पाहा रेसिपीज

रेगुलर मिल्कशेक आणि ज्यूसपेक्षाही जास्त हेल्दी म्हणून स्मूदीची ओळख आहे. आपल्या आवडीनुसार, सहज उपलब्ध साहित्यात सोप्या पद्धतीने बनवा स्मूदी

मिल्कशेक पिऊन कंटाळा आलाय? घरच्या घरी अगदी काही मिनिटांमध्ये बनवा हे ५ हेल्दी स्मूदी; पाहा रेसिपीज
वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या सोप्या स्मूदी रेसिपीज नक्की ट्राय करा

स्मूदी हा प्रकार गेल्या काही वर्षात फार ट्रेण्डमध्ये आला आहे. एकंदरीतच लोक हेल्दी लाईफस्टाइल कडे वळत असल्यामुळे स्मूदी ट्रेण्डमध्ये आली आहे. नेहमीच्या मिल्खशेकमध्ये एखाद फळ आणि दूध वापरले जातात. तर जूसमध्ये फक्त फळांचा वापर होतो. पण स्मूदीमध्ये फळ, दूध यासोबतच भाज्या, दही, ड्रायफ्रुट्स, मध, बदामाच दुध असे साहित्य वापरले जाते. खरतर स्मूदी बनवण्यासाठी ठरलेले असे साहित्य नाहीत. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही स्मूदी घरच्या घरी सहज बनवू शकता.

जाणून घेवूयात ह्या हेल्दी स्मूदी बनवायच्या कशा ?

या स्मूदी रेसिपी बनवण्यसाठी दिलेलं साहित्य एकत्र करून ३० सेकंद ते १ मिनिटांपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा. मिश्रणाला स्मूद टेक्शर आल्यावर तुमची स्मूदी तयार. ज्यांना स्मूदी जास्त गोड हवी असल्यास मिश्रणामध्ये  मध घाला.  स्मूदीला वरून ड्रायफ्रुट्स, भोपळ्याच्या बियांनी सजवायला विसरू नकात.

१.स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी

१ – केळ

१ आणि १/२ कप –  स्ट्रॉबेरी

१ टेबल स्पून – चिया सीड्स

३/४ कप – बदाम दूध

 

२. ऑरेंज कॅरेट जिंजर स्मूदी

१ – केळ

१ कप – ताज्या संत्र्याच्या फोडी

१/३ कप – किसलेले गाजर

१/२ टी- स्पून – ताजे किसलेले आले

१/२ कप –  बदाम दूध किंवा रेग्युलर दूध

१ – २  – बर्फाचे तुकडे (पर्यायी)

 

३. मंगो-पाइनॅपल स्मूदी

१ – केळ

१ कप – आंब्याचे तुकडे

१ कप – अननसाचे तुकडे

१ टेबल स्पून – चिया सीड्स

१ कप – दूध

 

४. एवोकॅडो-कुकुंबर स्मूदी (ग्रीन स्मूदी)

१ – केळ

१/२ कप – काकडीचे तुकडे

१ मध्यम आकाराचा एवोकॅडो

१ – २  – बर्फाचे तुकडे (पर्यायी)

 

५. चेरी-बीट स्मूदी

१ – केळ

१  कप -चेरी

१/२ कप – उकडलेले बीट

१/४ कप – ओट्स

३/४ कप – दूध

हे स्मूदी पावसाळ्यामध्येही घरच्या घरी बनवलेले अगदी पोषक पेय म्हणून सेवन करता येतील. मग या पावसाळ्यात करणार ना यापैकी किमान एखादा स्मूदी?

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-06-2021 at 13:25 IST

संबंधित बातम्या