Roti for Weight Loss: सध्या वाढतं वजन ही एक सर्वसामान्य; पण गंभीर समस्या बनली आहे. वाढत्या वजनामुळे केवळ व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत नाही, तर त्यासोबतच अनेक आजार लवकर वयातच शरीराला ग्रासतात. आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीचा आहार, कमी हालचाल व तणाव यांमुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं, रूपाचं सौंदर्य हरवतं आणि त्याबरोबरच अनेक गंभीर आजारांची सुरुवात होते. त्यामुळे वेळेत जागरूक होऊन वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक ठरतं. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या व्याधींसाठी वाढलेलं वजन हे एक मोठं कारण ठरतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं ही काळाची गरज आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन, व्यायाम, औषधं घेतात… पण तरीही फरक काही जाणवत नाही. अशा वेळी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी दिलेला एक साधा; पण प्रभावी सल्ला तुमचं आयुष्य बदलू शकतो.

गव्हाची चपाती थांबवा आणि सुरू करा ‘ही’ खास चपाती

डॉ. जैदी सांगतात, वजन कमी करायचं असेल, तर सगळ्यात आधी आपला आहार बदलणं अत्यावश्यक आहे. आपण गहू आरोग्यदायी समजून खाऊ लागतो; पण खरं पाहिलं, तर पोटाची चरबी वाढवण्यात गव्हाचा मोठा वाटा असतो. त्याच्या उलट, जर तुम्ही गव्हाऐवजी बाजरीची चपाती खायला सुरुवात केली, तर केवळ काही दिवसांतच फरक दिसू लागेल.

बाजरी हे एक लो-ग्लायसेमिक, ग्लुटेन-फ्री धान्य आहे. त्यामध्ये भरपूर फायबर, मॅग्नेशियम, आयर्न व फॉस्फरस हे घटक असतात. त्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम वाढतं आणि चरबी न साठता, बर्न होऊ लागते. दररोज सकाळी आणि दुपारी बाजरीच्या दोन-दोन चपाती खाल्ल्या, तर पोट भरल्यासारखं वाटतं, अनावश्यक खाण्याची इच्छा होत नाही आणि ऊर्जा टिकून राहते.

पचनासाठी उत्तम, गॅसच्या समस्येपासून सुटका

गव्हामध्ये असलेलं ग्लुटेन काही जणांच्या पचनासाठी त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे पोट फुगणं, गॅस होणं ही लक्षणं दिसतात. पण, बाजरी ग्लुटेन-फ्री असल्यानं अशा समस्या होत नाहीत. बाजरीत असलेल्या फायबरमुळे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी व अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुमेहींसाठी वरदान!

बाजरीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ती हळूहळू पचते. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्यानं वाढत नाही आणि त्यामुळे शरीर साखरेला चरबीमध्ये न साठवता, थेट उर्जेमध्ये रूपांतरित करतं.