Orange ginger Juice Health benefits : आजकाल सकाळी फळांचा रस पिणे लोकप्रिय होत चालले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा फळांचा रस प्यायलाच पाहिजे असे आवर्जून सांगितले जात होते. पण, हेल्थ प्रोफेशनल या गोष्टीशी अजिबात सहमत नाही आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. पण, जर तुम्हाला तरीही फळांचा रस पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकच ज्यूस पिऊ शकता. या ज्यूसमध्ये काही पौष्टिक घटक आहेत आणि जे घरी सुद्धा सहज बनवले जातात.

तर एम्समध्ये प्रशिक्षित आणि कॅलिफोर्नियास्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी त्यांच्या आवडतं पेय ‘ऑरेंज जिंजर शॉट’ ची रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे; ज्याचे तुम्ही सकाळी सेवन करू शकता…

संत्र-आल्याचा रस पिण्याचे फायदे…

संत्र-आल्याचा रस तीन पदार्थांपासून बनवले जातात. संत्र, आलं, गाजर. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन असते; ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात; जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात.

अहवाल असे सूचित करतात की, फ्लेव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेल्या वनस्पती संयुगांचा एक गट आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. आल्यामध्ये जिंजरॉल देखील असते; जे पचनास मदत करते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-ट्यूमर आणि अँटी-इंफ्लेमेटरी असे अनेक गुणधर्म असतात.

संत्र, आलं, गाजराचा रस कसा बनवायचा?

  • २ मध्यम गाजर सोलून त्यांचे लहान तुकडे करा.
  • १ संत्र सोलून मग १ इंचाचा आल्याचा तुकडा कापून घ्या.
  • हे सर्व साहित्य ज्युसरमध्ये टाका आणि रस बनवून घ्या.
  • जर तुमच्याकडे ज्युसर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही रस बनवू शकता.
  • रस गाळून ३ ते ४ छोटे शॉट बनवा.
  • प्रत्येक शॉट ३० ते ५० मिली असला पाहिजे अशी खात्री करा.
  • सकाळी प्या.

टीप: तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हा रस १ ते २ दिवसांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता…