Nana Patekar Death Cardiac Arrest vs Heart Attack: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाचे ठोके थांबतात आणि शरीरात रक्ताचा पुरवठा थांबतो. हे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय घडू शकतं.
काही वेळा हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित होणे सहज शक्य असते, विशेषतः जेव्हा ही लक्षणे हळूहळू सुरू होतात किंवा मध्येच येतात आणि जातात. शरीरात जाणवणारी नवीन किंवा असामान्य लक्षणे गांभीर्याने घेणे आणि तातडीने वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते. लोक अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात. मात्र, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
बहुतांश हार्ट अटॅकमुळे कार्डियाक अरेस्ट होत नाही. मात्र, जेव्हा कार्डियाक अरेस्ट होतो, तेव्हा हार्ट अटॅक हे त्यामागचे एक सामान्य कारण असते. इतर काही समस्यांमुळेही हृदयाचे ठोके थांबू शकतात. चला जाणून घेऊया हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये नेमका काय फरक आहे. तसेच त्यांची लक्षणे आणि अशावेळी तातडीने काय करावे.
कार्डियाक अरेस्टमध्ये काय होते? (Nana Patekar Death Reason)
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक धडधडणे बंद करते. असे साधारणपणे हृदयातील इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे होते. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात. हृदयाने रक्त पंप करणे बंद केल्यावर मेंदू, फुफ्फुसे आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचत नाही. कार्डियाक अरेस्ट झाल्यावर व्यक्ती कोणताही प्रतिसाद देत नाही. तिचा श्वास थांबू शकतो किंवा ती फक्त धापा टाकताना दिसू शकते. अशावेळी तातडीने मदत मिळाली नाही, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
तातडीने हे उपाय करा
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, एखाद्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट आल्यास तातडीने सीपीआर दिल्याने तिच्या वाचण्याची शक्यता दोन ते तीन पटींनी वाढू शकते. सर्वप्रथम स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर फोन करा आणि त्यानंतर सीपीआर सुरू करा. आजूबाजूला ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपलब्ध असल्यास, शक्य तितक्या लवकर त्याचा वापर करा.
जर दोन जण मदतीसाठी असतील, तर एका व्यक्तीने सीपीआर सुरू करावा. दुसऱ्या व्यक्तीने आपत्कालीन क्रमांकावर फोन करून AED शोधून आणावा. अशावेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. मदत न मिळाल्यास प्रत्येक मिनिटाला व्यक्ती वाचण्याची शक्यता सुमारे १० टक्क्यांनी कमी होत जाते. आपत्कालीन वैद्यकीय पथकही हृदयाचे ठोके बंद झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तातडीने मदत करू शकते.
हार्ट अटॅकमध्ये काय होते?
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. याचे कारण हृदयाला रक्तपुरवठा करणारी एखादी मुख्य रक्तवाहिनी ब्लॉक होणे हे असते. रक्तप्रवाहातील ही अडचण लवकर दूर केली नाही, तर ज्या भागाला पुरेसे रक्त मिळत नाही, त्या भागातील हृदयाच्या पेशी नष्ट होण्यास सुरुवात होऊ शकते.
हार्ट अटॅकची लक्षणे अचानक दिसू शकतात. यामध्ये छातीत तीव्र वेदना, शरीराच्या वरच्या भागातील इतर ठिकाणी अस्वस्थता किंवा वेदना, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम येणे, मळमळ किंवा उलटीसारखे वाटणे यांचा समावेश होतो. काही वेळा ही लक्षणे हळूहळू सुरू होतात आणि काही तास किंवा काही दिवसही राहू शकतात.
हार्ट अटॅक आल्यास तातडीने हे करा
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, कार्डियाक अरेस्टच्या उलट हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाचे ठोके सामान्यतः सुरू असतात. त्यामुळे वैद्यकीय मदत मिळण्यास जितका जास्त वेळ लागतो, तितका हृदयाला धोका वाढतो.
हार्ट अटॅक कोणालाही येऊ शकतो. महिला, मधुमेह असलेले लोक आणि वृद्ध व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे स्पष्टपणे दिसतीलच असे नाही. उदाहरणार्थ, त्यांना छातीत दुखत नसेल तरीही हार्ट अटॅक येऊ शकतो. तुम्हाला हा हार्ट अटॅक आहे की नाही याबद्दल खात्री नसली तरी स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर तातडीने फोन करा. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे आहे!
तातडीने इमर्जन्सी रूममध्ये पोहोचा
सर्वात चांगला उपाय म्हणजे स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर फोन करणे, जेणेकरून तुम्हाला शक्य तितक्या लवकर इमर्जन्सी रूममध्ये पोहोचवता येईल. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच उपचार सुरू करू शकतात. छातीत दुखत असल्याने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचणाऱ्या रुग्णांना साधारणपणे लवकर उपचार मिळतात.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
