Weak Heart Symptoms: हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. तो संपूर्ण शरीरात रक्त पोहोचवण्याचे काम करतो. पण हृदय व्यवस्थित काम करत नसेल, तर शरीर काही संकेत देऊ लागते. पुण्यातील इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ आणि जनरल फिजिशियन डॉ. शालिनी सिंह सालुंखे यांनी कमकुवत हृदयाची ओळख कशी करावी, याबद्दल माहिती दिली आहे.
जेवणानंतर जास्त सुस्ती येणे
जेवल्यानंतर खूप जास्त सुस्ती येत असेल किंवा छातीत दुखत असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा यामागे हृदय कमकुवत असणे हे कारण असू शकते.
संध्याकाळी पायांना सूज येणे
संध्याकाळच्या वेळी पाय किंवा घोट्यांवर सूज दिसत असेल, तर हेही हृदय कमकुवत असल्याचे लक्षण असू शकते. या स्थितीला पिटिंग एडेमा असे म्हणतात. हृदय कमकुवत झाल्यामुळे ते शरीरात व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही. त्यामुळे पायांमध्ये द्रव (फ्लुइड) साचू लागतो.
खाली वाकल्यावर धाप लागणे
डॉ. शालिनी सिंह सालुंखे यांच्या मते, खाली वाकल्यावर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा धाप लागत असेल, तर तेही हृदय कमकुवत असल्याचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला बेंडोप्निया असे म्हणतात.
जेवणानंतर पोट फुगणे
डॉ. शालिनी सिंह सालुंखे यांच्या म्हणण्यानुसार, थोडेसे जेवल्यानंतरही पोट फुगत असेल किंवा ब्लोटिंगची समस्या होत असेल, तर ही समस्या हलक्यात घेऊ नका.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
