Seeds for Heart Health and Bones: निरोगी राहण्यासाठी आहारात पोषक तत्त्वांनी भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. या पदार्थांमध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (मिनरल्स) भरपूर प्रमाणात असतात. ही पोषक तत्त्वे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, काही बियांचे नियमित आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
विशेषतः, या बिया हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या बिया आहारात आवर्जून समाविष्ट कराव्यात.
चांगल्या आरोग्यासाठी या बियांचा आहारात समावेश करा
अळशीच्या बिया: अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, तर ओमेगा-३ फॅटी ॲसिड खराब कोलेस्ट्रॉल (बॅड कोलेस्ट्रॉल) नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. दररोज १ ते २ मोठे चमचे अळशीच्या बियांचे सेवन करू शकता.
चिया सीड्स: चिया सीड्सला सुपरफूड मानले जाते, कारण त्यामध्ये अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. त्यातील विरघळणारे फायबर (सोल्युबल फायबर) पचन सुधारते आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडही असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच, त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेसाठीही फायदेशीर असतात. चिया सीड्स पाण्यात भिजवून, दही किंवा ओट्ससोबत खाऊ शकता.
भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बिया पोषक तत्त्वांचा उत्तम स्रोत मानल्या जातात. यामध्ये झिंक, प्रथिने, फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियममुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच, या बिया केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. त्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत करतात. दररोज एक चमचा भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
