Heart Disease: न्याहारी हे दिवसाचे महत्त्वाचे जेवण आहे. सकाळची न्याहारी चांगली केली की संपूर्ण दिवस चांगला जातो. तसंच आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्याही सकाळचा पौष्टिक नाश्ता केला की उद्भभवत नाहीत. सकाळचा नाश्ता जर तुम्ही वगळला तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बराच वेळ नाश्ता वगळल्याने आजारी पडण्याचा धोका वाढतो. त्याच वेळी, दिवसाच्या सुरुवातीला निरोगी नाश्ता घेतल्यास मेटाबॉलिजम जलद होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही नाश्त्यात कोणते पदार्थ समाविष्ट करता त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. यासाठी ताजी फळे, दूध, हिरव्या पालेभाज्या, सॅलेड, अंडी आदींचा नाश्त्यात समावेश करावा. तसंच, हृदयाशी संबंधित आजारग्रस्तांनी सकाळच्या नाश्त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. दररोज सकाळी उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करावा. त्याच वेळी, आहारात चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. याशिवाय तळलेले पदार्थही कमी खावेत. जर तुम्हीही हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल तर निरोगी राहण्यासाठी या पदार्थांचे सेवन नाश्तामध्ये नक्की करा.

( हे ही वाचा: स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेसाठी ‘या’ सुपरफूडचा आहारात समावेश करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

ओट्स खा

ओट्समध्ये भरपूर फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि बीटा-ग्लुकन हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय फायबरमुळे क्रेविंगच्या समस्येपासून आराम मिळतो. रोज ओट्सचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी देखील बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहते. यासाठी रोज नाश्त्यात ओट्सचे सेवन केले जाऊ शकते.

एवोकॅडो खा

२०२२ च्या एका संशोधनानुसार, दिवसातून दोनदा एवोकॅडो खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका १६ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. जे लोक दररोज अॅव्होकॅडोचे सेवन करतात त्यांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी असतो. यामध्ये व्हिटॅमिन-ई, अँटिऑक्सिडेंट, बीटा-सिटोस्टेरॉल, अँटी-इंफ्लेमेटरी, कॅरोटीनॉइड्स आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्ससह अनेक आवश्यक घटक असतात, जे हृदयरोगांवर फायदेशीर असतात.

( हे ही वाचा: Blood Purifying Foods: नैसर्गिकरित्या रक्त स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; औषधं-गोळ्यांची गरज भासणार नाही)

एवोकॅडोमध्ये ९६ कॅलरीज, ६ ग्रॅम मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि ४ ग्रॅम फायबर असते. हे सर्व आवश्यक पोषक घटक वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. याशिवाय तुम्ही प्रथिनेयुक्त अन्नपदार्थ न्याहारीमध्ये अंडी, केळीचे सेवन करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart patients should eat these things for breakfast to stay healthy gps
First published on: 10-08-2022 at 11:54 IST