हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

हिवाळ्यात हृदयविकार टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.

हृदयरोग्यांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.(photo credit: jansatta)

हिवाळा सुरू झाला की अनेक आजारही वाढतात. हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास वृद्ध आणि लहान मुलांना होतो. सर्दी सुरू झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या वाढतात. तज्ज्ञांच्या मते, हृदयरोग्यांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी. थंडीच्या मोसमात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या वृद्धांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे हृदयाच्या समस्या निर्माण होतात

थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे हृदय रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताभिसरण कमी होते. त्यामुळे हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात अडचण येते. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडू शकते. हिवाळ्यात हृदयविकार टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.

थंडीपासून संरक्षण करा

जे हृदयरोगी आहेत किंवा वृद्ध आहेत त्यांनी थंडीपासून दूर राहावे. थंड हवामानात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी योग्य कपडे निवडणे आवश्यक आहे. यासोबत गरम पदार्थांचे सेवन करावे.

धुक्यात जाणे टाळा

मॉर्निंग वॉकमुळे आरोग्य चांगले राहते असा अनेकांचा समज आहे. पण हिवाळ्यात धुके असते, जे श्वासासाठी धोकादायक ठरू शकते. अशा स्थितीत विशेषतः वृद्धांनी सूर्य उगवल्यानंतरच फिरायला जावे.

चरबीयुक्त अन्न खाऊ नका

हिवाळ्याच्या दिवसात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहत नाही. अशावेळी सहज पचणारे अन्नच खावे. फॅटी फूड खाल्ल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

वेळोवेळी रक्तदाब तपासा

ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमितपणे स्वतःची तपासणी करून घ्यावी. यासोबतच ज्यांनी रोज काही वेळ उन्हात बसावे. सूर्यकिरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन डी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heart patients should take more care in winter here are the reasons scsm

Next Story
मधुमेहाचा झोपेवरही होतो परिणाम, ‘या’ समस्या असतील तर करु नका दुर्लक्ष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी