मुख दुर्गंधी किंवा श्वासाची दुर्गंधी रोखण्यासाठी काही छोटे उपाय करता येतात. त्यासाठी या मागची मूळ कारणे ओळखून ती दूर करता येतात. तोंडात जिवाणूंच्या वाढीमुळे दुर्गंध येतो. पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे, सतत खात राहणे, पोटाचे आरोग्य चांगले नसणे, दीर्घकाळ बद्धकोष्टतेचा त्रास, आप्लपित्ताचा तीव्र त्रास व झोपेत तोंड उघडे पडून त्याद्वारे श्वासोच्छ्वास होणे आदी कारणांमुळे ही दुर्गंधी निर्माण होते, असे तज्ज्ञ सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर याचे मूळ कारण शोधून ते घालवणे गरजेचे असते. तरीही तज्ज्ञांच्या मतानुसार हा दुर्गंध रोखण्यासाठी काही उपाय करता येतात. दिवसातून दोनदा ब्रशने दात घासणे. तसेच जीभ सकाळी साफ करण्याने तोंडातील अशुद्धी दूर होते. रात्री झोपतानाही हे नियमित केल्यास निद्रावस्थेत जाताना तोंड स्वच्छ राहते. त्यामुळे आपल्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heath news possible overcome bad breath small measures breathing ysh
First published on: 15-06-2022 at 00:02 IST