घरात प्रेम आणि आपुलकी टिकवणे अवघड नसून संयमाची गोष्ट आहे. प्रत्येक संकटात सोबत उभं राहणं, सगळ्यांच्या सुखाचा विचार करणं, सगळ्यांशी प्रेमाने राहणं याचं नाव घर आहे. आपत्ती किंवा मोठी समस्या आल्याने घरातील आनंदाला ग्रहण लागू शकते, असे म्हणतात, पण ९० टक्के समस्यांना आपणच जबाबदार असतो, बाकीची आपली कृती जबाबदार असते. खरं तर लोकांची इच्छा असेल तर सर्व समस्या सुटू शकतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा काही उपयांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरात आनंद आणि प्रेम टिकवून ठेवू शकता.

१. जोडीदाराची साथ द्या

पती-पत्नीचे नाते तेव्हाच यशस्वी मानले जाते जेव्हा एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, आदर आणि काळजीची भावना असते. आपण बाहेर कामाला जातोय, त्यामुळे बायकोने घराची सर्व जबाबदारी सांभाळली पाहिजे हे विचार करणे चुकीचे आहे. याने भांडण होऊ शकते किंवा अशा विचाराने घर उध्वस्त होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही कामावर गेलात तरीही येऊन छोट्या छोट्या कामात मदत करू शकता. यामुळे तुमचे नातेही नीट टिकते.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

२. कुटुंबाला वेळ द्या

अनेकजण त्यांच्या बिझी वेळापत्रकामुळे सतत कामांत असतात. त्यामुळे त्यांना कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या व्यक्तीला वेळ देता येत नाही. यामुळे कुठेतरी संवाद थांबतो आणि त्यामुळे घरातील वातावरण बिघडते. त्यासाठी ऑफिसनंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोला. याने तुमचे घरातल्या इतर सदस्यांसोबत नाते नीट राहील.

३. कामाच्या ठिकाणी आणि घरी अंतर ठेवा

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अंतर ठेवा. यामुळे तुमचा एका गोष्टींवरील ताण दुसऱ्या गोष्टीवर निघणार नाही. त्यामुळे घरात भांडण होणार नाहीत आणि वातावरण देखील चांगले राहील. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अंतर ठेवणे चांगल्या आयुष्यासाठी फायदेशीर आहे.