उत्तम आरोग्यासाठी दुधाचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्याने ते शरीरातील हाडांच्या विकासासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपण दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दुधाचे सेवन आवर्जून करावे. मात्र वेळेअभावी लोकांना घाईघाईने दुधासह चुकीच्या गोष्टींचे सेवन करण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना अनेकदा आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपण लक्षात घ्यायला हवे की, असे काही पदार्थ आहेत ज्याचे सेवन दुधासोबत केल्यास ते हानिकारक असू शकतात. कधी कधी आपण दुधापासून असे काही पेय बनवतो की त्याचा फायदा होण्याऐवजी आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आयुर्वेदानुसार आपण दुधाचे सेवन करतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. या गोष्टी न लक्षात घेतल्यास त्याचा परिणाम पचनक्रियेवर होऊ शकतो. तसेच एखादी फूड अॅीलर्जी देखील होऊ शकते.

1. बर्यातच वेळा आपण मिल्कशेक बनवताना स्ट्रॉबेरी, ब्ल्यु बेरी, चेरी असे प्रकार दुधात टाकत असतो. पण याच्या सेवनाने आपली पचनक्रिया बिघडू शकते. याबरोबर कधी कधी फूड एलर्जी देखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर स्ट्रॉबेरी, ब्ल्यु बेरी, चेरी खायची असेल तर दूध प्यायल्यानंतर एक तासाने किंवा काही तासांनी खावे.

loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

2. दुधासोबत कधीच संत्री, अननस या आंबट फळांचे सेवन करू नये. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी बरोबर साइट्रिक एसिड असल्याने दुधाबरोबर ही फळे खाल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

3. आयुर्वेदानुसार दुधाबरोबर कधीही दह्याचे सेवन करू नये. जर तुम्ही दह्याचे सेवन केले तर पचनक्रिया बिघडू शकते आणि गॅस, ओटीपोटात दुखणे अश्या समस्या उद्भवू शकतात.

4. दुधाबरोबर जर तुम्ही नमकीन बिस्किट किंवा अन्य खारट पदार्थ खाऊ नये. कारण याने तुम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो.

5. जर तुम्ही दुधासह पास्ता, मैदा, ब्रेड इत्यादी हार्ड-स्टार्ट पदार्थ खाल्ले तर हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या सर्व गोष्टी खाण्यासाठी आणि पचवण्यासाठी शरीराला खूप कष्ट करावे लागतात. म्हणूनच गॅस, थकवा जाणवणे, अपचन इत्यादी समस्या सुरू होतात.
(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा अथवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)