किचनचे काम सोपे वाटत असले तरी ते खूप थकवणारे आहे. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी त्रासाचे कारण बनतात तेव्हा अडचणी वाढतात. किचनचे कामकाज सांभाळणे किती अवघड असते, हे फक्त ती हाताळणारी व्यक्तीच सांगू शकते. तुम्हीही स्वयंपाकघर सांभाळत असाल आणि काही वेळा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्रास होतो, ठेवलेल्या अन्नाला वास येणे, दूध उकळून गॅसवरून खाली सांडणे, भाजीपाला धुणे इत्यादी अनेक छोटी कामे असतात. जे थकवणारे आहेत. अशीच काही कामे सुलभ करण्यासाठी आम्ही तुम्हाला टिप्स सांगणार आहोत.या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील काम सोपे करू शकता.

स्वयंपाकघरात काम करताना या टिप्स फॉलो करा

टपरवेअरचा वास

टपरवेअर बॉक्सला कधीकधी एक विचित्र वास येतो. जर तुम्ही ते काढू शकत नसाल तर सोपा मार्ग अवलंबा. टपरवेअर नीट धुऊन झाल्यावर ते पुसून त्यात वर्तमानपत्राचा तुकडा ठेवा आणि रात्रभर तसाच ठेवा. सकाळपर्यंत टपरवेअरचा वास निघून जाईल.

sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स

दूध उकळणे

किचनमध्ये काम करताना अनेकदा असे घडते की आपण दूध गॅसवर ठेवल्यावर विसरतो, त्यामुळे ते उकळते आणि सांडते. असे तुमच्यासोबत वारंवार होत असेल तर दूध गरम करताना भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा. यातून दूध खाली सांडणार नाही.

स्टेनलेस स्टील स्वच्छता

तुमच्या स्वयंपाकघरात अनेक स्टेनलेस स्टीलची भांडी असतील आणि ती व्यवस्थित साफ केली जात नसतील तर त्यांना स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करा. भांड्यांवर डाग असल्यास अल्कोहोल लावून कापसाच्या मदतीने धुवा. डाग निघून जातील.

मायक्रोवेव्हचा वास

मायक्रोवेव्हच्या वापरादरम्यान अनेक वेळा त्यातून एक विचित्र वास येतो. ते काढण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये डिश साबण काही मिनिटे ठेवा आणि २-३ मिनिटे मायक्रोवेव्ह करा. एक मिनिट चालू करा. नंतर अर्धा तास आतमध्ये साबण तसाच ठेवा. त्यानंतर, टॉवेलच्या मदतीने, मायक्रोवेव्हच्या आतील सर्व जागा चांगल्या प्रकारे पुसून टाका. मायक्रोवेव्हमधून वास निघून जाईल.

तांब्याची भांडी साफ करणे

जर तुमच्या घरात तांब्याची भांडी असतील आणि तुम्ही त्यांना चांगले चमकवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी टोमॅटो केचप वापरा. कपड्यात थोडा केचप टाकून तांब्याच्या भांड्यावर घासून घ्या. यानंतर भांडे कोमट पाण्याने चांगले धुवावे. भांडे नवीन सारखे दिसेल.