scorecardresearch

देवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…

भारतात एक मंदिर असंही आहे जिथे देवीला नूडल्सचा प्रसाद दिला जातो. हे थोडे विचित्र जरी वाटत असलं तरी मात्र हे खरं आहे. जाणून घ्या कोणती आहे ही देवी.

देवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…
फोटो – प्रातिनिधिक

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते. नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात. मात्र, भारतात अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत, त्यांच्या संबंधित रंजक गोष्टी इतरांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. भारतात एक मंदिर देखील आहे ज्याला चायनीज काली मंदिर म्हणतात. विशेष म्हणजे येथे नूडल्सचा प्रसाद दिला जातो. हे थोडे विचित्र जरी वाटत असलं तरी मात्र हे खरं आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ‘चायनीज काली टेम्पल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिरात नूडल्स, मोमोजपासून ते भात आणि भाजीपाला पदार्थांपर्यंत प्रसाद मिळतो. हे मंदिर कोलकात्याच्या माथेश्‍वरताला रोडवर वसलेले आहे, टांगरा याला ‘चायना टाउन’ देखील म्हणतात.

आणखी वाचा : Navratri 2022 : नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा ही पेयं; शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ठरतील उपयुक्त

माता दुर्गेच्या रूपात कालीची पूजा करण्यासाठी चिनी समुदाय येथे जमला होता आणि एका क्षणी प्रत्येकजण झाडाखाली पूजा करू लागला आणि आज ते एक प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भाविकांना प्रसादाच्या रूपात नूडल्स दिले जातात आणि यामुळे ते इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे.

टेंगरा येथे बौद्ध आणि ख्रिश्चन प्रथा अधिक पाळल्या जात असल्या तरी नवरात्रीच्या काळात येथील कालीपूजेचे वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते. हे मंदिर १९९८ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या