Hair Care Tips : अशाप्रकारे करा आवळ्याचा वापर; केस बनतील दाट आणि मजबूत

केस गळणे थांबविण्यासाठी आणि वाढीसाठी अनेक उपाय आहेत. परंतु आवळ्याची ही रेसिपी एक आश्चर्यकारक आहे. आवळ्याचा हेअर मास्क बनवायला अगदी सोपा आहे.

Hair Care Tips : अशाप्रकारे करा आवळ्याचा वापर; केस बनतील दाट आणि मजबूत
आवळा हेयर मास्क केसांसाठी फायदेशीर आहे ( फोटो : pexeles )

Hair Care Tips: केस गळणे ही एक गंभीर समस्या आहे. सध्या बदलत्या जीवनशैली मुळे तसंच धूळ, माती आणि सूर्यप्रकाशाचा प्रभाव यांमुळे एकदा केस गळायला लागले की थांबायचं नाव घेत नाही. पण, तुमच्या समस्येचे समाधान केवळ एका साहित्यात दडलेले आहे. खरंतर पूर्वजांपासून चालत आलेली ही रेसिपी अनेक फायद्यांसाठी ओळखली जाते. केवळ केस गळणेच नाही तर केसांशी संबंधित अनेक समस्या या एका रेसिपीने दूर केल्या जाऊ शकतात. ही रेसिपी आहे आवळ्याची. आवळ्याचा केसांसाठीचा उपयोग तुम्ही तुमच्या आजीकडून देखील ऐकला असेल. तर जाणून घेऊया केसांसाठी आवळ्याचा मास्क बनविण्याची रेसिपी.

केस वाढीसाठी आवळ्याचा उपयोग

१) आवळा केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो, ज्यामुळे केस मजबूत आणि घट्ट होतात.

२) आवळ्यामध्ये असलेले पोषक तत्व केसांसाठी योग्य घटक बनवतात.

३) आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते जे कोलेजन प्रोटीन तयार करण्यास मदत करते. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि केसांची लांबी वाढवते. कोलेजन केसांच्या फॉलिकल्स मधून मृत पेशी काढून टाकते आणि नवीन पेशी तयार करते.

४) केसांमधील कोंडा दूर करण्यासाठीही आवळा उपयुक्त आहे. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंडा आणि त्यामुळे होणारी खाज दूर करतात.

५) केसांचा रंग सुधारण्यासाठी, आवळ्याची पावडर नेहमी मेंदीमध्ये मिसळली जाते. तसंच केस काळे करण्यासाठी देखील वापरले जाते.

आवळा हेअर मास्क लावण्याची पद्धत

केसांच्या वाढीसाठी आवळा लावणे सोपे आहे. आवळासोबत हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला लिंबाचीही गरज लागेल. यासाठी एक चमचा आवळा पावडर घ्या आणि त्यात फक्त एक चमचा लिंबाचा रस मिसळा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही आवळा पावडर कमी-जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता या दोन्हीमध्ये थोडं पाणी घालून नीट मिसळा. १० मिनिटे डोक्यावर ठेवल्यानंतर हा हेअर मास्क स्वच्छ धुवा. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांना लावू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देताय?; जाणून घ्या या पाण्याचे आश्चर्यकारक फायदे
फोटो गॅलरी