Know all about beauty parlour stroke syndrome : तुम्हीही यातलेच आहात का, ज्यांना पार्लरमध्ये जाऊन हेअर वॉश करायला आवडतो? पार्लरमध्ये हळूवारपणे डोक्यातून फिरणाऱ्या हातांनी रिलॅक्सिंग वाटतं, पण या रिलॅक्सिंग मोडमध्ये त्या चेअरवर बसल्यावर मागे मान करून मानेवर येणारा ताण गंभीर समस्या निर्माण करू शकतात. याला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हटलं जातं. सलूनमध्ये केस धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅकवॉश बेसिनवर बसल्याने मानदुखी, दुखापत आणि अगदी क्वचित प्रसंगी अगदी जीवघेणा स्ट्रोकदेखील होऊ शकतो.

१९९३ मध्ये अमेरिकन न्यूरोलॉजिस्ट, मायकेल वेनट्राब यांनी BPSS ची ओळख पहिल्यांदा केली होती, ज्यांना असे आढळून आले की त्यांच्या काही रुग्णांनी पार्लरमध्ये केस धुतल्यानंतर त्यांच्यात स्ट्रोकसंबंधित गंभीर लक्षणे विकसित झाली होती. स्ट्रोक म्हणजे मेंदूला होणारा रक्तप्रवाह अचानक कमी झाल्यामुळे मेंदूचा झटका. हे सामान्यत: रक्ताच्या गुठळ्यामुळे अडथळे निर्माण झाल्याने किंवा मेंदूतील प्रमुख रक्तवाहिनी फाटणे आणि फुटणे – यामुळे ऑक्सिजन, ग्लुकोज आणि पोषक घटक कमी होतात, जे मेंदूच्या पेशींना नुकसान करतात आणि मारतात. यामुळे कधी कधी मृत्यूही होऊ शकतो.

Car washing tips these parts should be prevented from water while washing the car
कार धुताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होईल लाखो रुपयांचं नुकसान! ‘या’ भागांमध्ये पाणी गेलं तर गाडी होईल कायमची खराब
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
Shocking video of elder woman dies because of doctor watches reels in manipur hospital viral video in up
डॉक्टर की हैवान? मरणाच्या दारात असलेल्या महिलेला सोडून मोबाईलवर बघत होता रील, VIDEO पाहून बसेल धक्का
Shocking video Woman finds worms in chicken woman who ate chicken had larvae in her meal gave up meat after watching
आवडीने चिकन खाताय? अर्ध चिकन खाऊन झाल्यावर महिलेला आतमध्ये काय दिसलं पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल

पार्लरमध्ये केस धुताना शॅम्पू लावण्याच्या प्रक्रियेदरम्यान, ग्राहकांना सहसा खाली बसण्यास सांगितले जाते आणि त्यांचे डोके वॉशबेसिनच्या काठावर टेकवले जाते. संशोधन असे सूचित करते की, सिंकच्या कडक रिमवर डोके आणि मान जास्त वेळ ठेवल्यानं गंभीर परिणाम होऊ शकतात. मानेची असामान्य स्थिती, मानेचे फिरणे किंवा जोरदार शॅम्पू करताना अचानक धक्का बसणे, यामुळे मानेच्या क्षेत्राभोवती असलेल्या उच्च पाठीचा कणा, मेंदूचा मागचा भाग आणि खालच्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी एकाला धक्का बसू शकतो. स्ट्रोकची समस्या बहुतेकदा वृद्ध लोकांमध्ये जास्त असते किंवा ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या वैद्यकीय समस्या असतात. परंतु, तरुण निरोगी लोकांनादेखील स्ट्रोक होऊ शकतो. संशोधनानुसार ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये ही समस्या होण्याची शक्यता असते .

यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, अंधूक किंवा अरुंद दृष्टी, मळमळ, उलट्या, मानेमध्ये वेदना आणि शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू यांचा समावेश होतो.

काय काळजी घ्यायची

पार्लरमध्ये बॅकवॉश किंवा सिंक वापरताना वेदना आणि अस्वस्थता अनुभवत असाल तर बेसिनच्या रिमवर तुमचे डोके मागे वळवण्यापेक्षा सिंकवर पुढे झुकण्यास सांगा. सलूनमध्ये बॅकवॉश टाळणे शक्य नसल्यास, केस धुताना मानेचा आधार घ्या. केस ज्या वेगाने धुतले जातात, किती वेळ लागतो आणि धूत असताना डोक्याला आणि मानेला झटका तर बसत नाही ना याची काळजी घ्या. हळूवारपणे धुण्याची विनंती करा, बॅकवॉशच्या स्थितीत जास्त वेळ न राहण्याचा प्रयत्न करा आणि वॉशिंगदरम्यान तुम्हाला काही अस्वस्थता जाणवल्यास लगेच सांगा.

जर तुम्हाला ही लक्षणं दिसली तर पार्लरला जाणं बंद करा, हा उपाय नाही; पण न्यूरोलॉजिस्टला दाखवा. नियमित मानेचे व्यायाम करा. सकस आहार घ्या. रक्तातल्या साखरेचं प्रमाण आणि ब्लडप्रेशर तपासत रहा. त्यावर उपचार करा. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Story img Loader