Bad Cholesterol Symptoms In Hand Legs: शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे नेहमीच नकोश्या वाटणाऱ्या आजारांना आमंत्रण ठरते. या कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. खरंतर कोलेस्ट्रॉल हे काही प्रमाणात शरीरासाठी लाभदायक सुद्धा असते पण जेव्हा बॅड व गुड दोन्ही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते तेव्हा त्यातून शरीराला अपायच अधिक होतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदय विकार, हार्ट अटॅक, हार्ट स्टोरक सारखे धोके बळावतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय आहेत?

सर्वात चिंतेचे बाब अशी की शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल आहे याचे एक स्पष्ट लक्षण दिसत नाही म्हणूनच अनेकदा केवळ वजन वाढणे हे निकष बाळगले जाते. पण मित्रांनो आपण शरीरातील लहान बदलही ओळखायला हवेत. कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांना संकुचित करत असल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी शरीराच्या प्रत्येक अवयवाला आवश्यक तितके रक्त पोहोचू शकता नाही. याचा परिणाम तुमच्या हात व पायावर सर्वात आधी दिसून येऊ शकतो.

हातापायावरून ओळखता येतं हाय कोलेस्ट्रॉल

अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या माहितीनुसार जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा तुमच्या हाता पायाच्या काही भागांमध्ये असहनीय वेदना सुरु होऊ शकतात. विशेषतः कोपर- ढोपर, घोटे- मनगट या जोडणी करणाऱ्या अवयवांमध्ये दुखू लागते. कोलेस्ट्रॉल वाढून काही वेळा आपले हात व पाय अक्षरशः सुन्न होऊ शकतात. तर शरीरात गाठी झाल्याचे सुद्धा जाणवू शकते. अनेकदा ज्या भंगार कोलेस्ट्रॉल वाढले आहे त्या आजूबाजूची त्वचा हलकीशी पिवळसर दिसू लागते.

हे ही वाचा<< चहाबरोबर ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने १०० च्या वेगाने वाढू शकते आम्ल; तुम्हालाही आहेत का ‘या’ सवयी?

डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या अहवालानुसार कोलेस्ट्रॉलमुळे रक्तात गाठी तयार होऊ शकतात ज्या तीन इंच रुंदीच्या असू शकतात. यामुळे टाइप १ ट्युमरचा धोका असतो. जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर घाबरून जाण्याचे कारण नाही पण एकदा आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.

कोलेस्ट्रॉल वाढल्यास कसे असावे Diet?

दरम्यान, कोलेस्ट्रॉल नियंत्रण हे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या माहितीनुसार फायबर युक्त पदार्थांचे सेवन हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात गुणकारी मानले जाते. आपल्या आहारात डाळी, बीन्स, मटार अशा भाज्या, तसेच संत्री, केळी, पेर अशी फळे सुद्धा आवर्जून समाविष्ट करावीत. वारंवार दारू प्यायल्याने आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलसह ट्राइग्लिसराइडचे प्रमाण सुद्धा वाढू शकते जे रक्त दाब वाढवण्यास कारणीभूत मानले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, आवश्यक असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High cholesterol level 5 signs and symptoms of seen in the feet and hand know from health expert svs
First published on: 05-01-2023 at 19:37 IST