High Uric Acid Vegetables: शरद ऋतुच्या काळात सर्वात जास्त दिसणारी तक्रार म्हणजे युरिक अॅसिड वाढणे, सांध्यात होणारी आग ओकणारी वेदना आणि चालताना जाणवणारी चिरचिर. अनेकांना वाटतं की हे फक्त मांसाहार किंवा मद्यपानामुळे वाढतं… पण खरी कहाणी यापेक्षा खूप धक्कादायक आहे. आपण रोज जे काही खातो पितो, त्या दैनंदिन आहारात लपलेले काही अन्नपदार्थ शरीरात युरिक अॅसिडचा स्फोट घडवतात, हे अनेकांना माहीतच नसतं.
युरिक अॅसिड साधारणपणे लघवीद्वारे बाहेर पडतं. परंतु, ही प्रक्रिया बिघडली तर हे अॅसिड रक्तात जमा होऊ लागतं आणि नंतर सांध्यांत तीक्ष्ण सुयांसारखे क्रिस्टल तयार होतात, ज्यामुळे चालणं-उठणं अशक्य होतं. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास गाऊट, सांधेदुखी, किडनीचे त्रासही निर्माण होऊ शकतात.
यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण निरोगी समजून जे काही भाज्यांमध्ये खातो, त्यापैकी काही भाज्या युरिक अॅसिडला आकाशाला भिडवतात! चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या धोकादायक भाज्या…
‘या’ ३ भाज्या झपाट्याने वाढवतात युरिक ॲसिड
१) फुलकोबी – निरोगी समजली जाणारी पण ‘प्यूरिन बॉम्ब’!
फुलकोबी पाहताक्षणी निरुपद्रवी वाटते… पण, ज्यांचा युरिक अॅसिड आधीच जास्त असतो त्यांच्यासाठी ही भाजी विषासमान ठरते. हेल्थलाइनच्या माहितीनुसार फुलकोबीमध्ये प्यूरिनचे प्रमाण अत्यंत जास्त असते. प्यूरिन शरीरात जाऊन थेट युरिक अॅसिडमध्ये रूपांतरित होतं. गोबी पराठे, भाजी, मसाला-कुर्मा… अशा रूपात वारंवार सेवन केल्यास हे अॅसिड झपाट्याने वाढतं.
याऐवजी काय खावे?
लौकी, तुरई यांसारख्या हलक्या, थंड प्रकृतीच्या भाज्या खा. या शरीराला हायड्रेट ठेवतात, विषारी द्रव्ये बाहेर काढतात आणि युरिक अॅसिड कमी करतात.
२) पालक – पौष्टिक पण युरिक अॅसिडसाठी घातक!
“पालक म्हणजे आरोग्य!” – हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण, ज्यांचं युरिक अॅसिड वाढलेलं असतं, त्यांच्यासाठी पालक गुप्त शत्रू बनतो.
पालकात ऑक्सालेट आणि प्यूरिन दोन्हींचं प्रमाण जास्त असतं. दररोज पालक, पालक पनीर, पालक पकोडे किंवा इतर डिशमध्ये पालक खाल्ल्यास काही दिवसांतच युरिक अॅसिड उसळू लागतं.
याऐवजी काय खावे?
मेथी हा उत्तम पर्याय! मेथी पचायला हलकी, प्यूरिन कमी आणि सांध्यातील सूज–दुखणं कमी करण्यास मदत करणारी आहे.
३) मशरूम – पौष्टिक पण युरिक अॅसिड वाढवणारी!
मशरूम हे पौष्टिक मानलं जातं, प्रोटीनही भरपूर… पण, ज्यांचे युरिक अॅसिड आधीच वाढलेलं असतं त्यांनी यापासून दूर राहणं अत्यावश्यक आहे. मशरूममध्ये प्यूरिनयुक्त संयुगं असतात. जर ते ग्रेव्हीत मसालेदार करून किंवा वारंवार खाल्ले गेले तर युरिक अॅसिडचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढू शकतं.
याऐवजी काय खावे?
टोंड मिल्कपासून बनवलेलं पनीर किंवा टोफू खा. हे हलके, पचायला सोपे आणि प्यूरिन कमी असलेले पर्याय आहेत.
तर सावधान!
ही तीन भाज्या फुलकोबी, पालक आणि मशरूम युरिक अॅसिड वाढवण्यामागची मोठी कारणं आहेत आणि अनेक जण अनाहूतपणे रोज त्यांचे सेवन करत असतात. युरिक अॅसिड नियंत्रित ठेवायचं असल्यास लगेचच या भाज्या आहारातून कमी करा. योग्य भाजी, योग्य डाएट आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय…
सांधेदुखीपासून कायमचा दिलासा देऊ शकतो!
