Lower Uric Acid Naturally: आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनशैलीत युरिक अॅसिड वाढणे ही अत्यंत सामान्य पण घातक समस्या बनली आहे. शरीरात शांतपणे मुरत जाणारी ही त्रासदायक स्थिती अचानक गाऊट, सांधेदुखी, सूज, किडनीतील खडे आणि तीव्र वेदना निर्माण करू शकते. खरा धक्का बसतो तो म्हणजे… आपल्या दिवसेंदिवस खाल्ल्या जाणाऱ्या आहारामुळेच. अनेकांना प्रश्न पडतो, शरीरात युरिक अॅसिड तयार कसं होतं? तर, शरीरात प्यूरिन नावाच्या घटकांचे विघटन झाले की युरिक अॅसिड निर्माण होते. हे प्यूरिन प्रामुख्याने लाल मांस, मद्यपान आणि अवाजवी प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. औषधे दिलासा देतात, पण दररोजचा आहारच हे संकट नैसर्गिकरित्या कमी करू शकतो हे लक्षात ठेवायला हवं.
आज आम्ही तुम्हाला ७ असे अन्नपदार्थ सांगणार आहोत, जे युरिक अॅसिडची पातळी जवळजवळ तात्काळ कमी करतात… आणि हे वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
युरिक अॅसिड वाढल्याची प्रमुख लक्षणे
- मोठ्या पायाच्या अंगठ्यात सुई टोचल्यासारखी वेदना (गाऊट)
- सांध्यांमध्ये सूज, लालसरपणा आणि उष्णता
- विश्रांतीनंतर सांधे कडक होणे
- किडनी स्टोनची शक्यता-पाठीच्या बाजूला तीव्र वेदना
- लघवी करताना त्रास किंवा लघवीत रक्त
- थकवा, अशक्तपणा, चिडचिड
जर तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर आजची माहिती तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे!
१) चेरी
साध्या चेरी नव्हे, तर टार्ट चेरी म्हणजे युरिक अॅसिड कमी करणारी नैसर्गिक जादूची कळी! २०१२ मधील संशोधनात आढळलं की, चेरी खाल्ल्याने गाऊटचे झटके तब्बल ३५% ने कमी झाले. चेरीतील अँथोसायनिन्स शरीरातील सूज कमी करतात आणि अॅसिड बाहेर टाकण्याची क्षमता वाढवतात. दररोज एक मूठ चेरी किंवा न गोड केलेला चेरी ज्यूस – इतकंच पुरेसं!
२) कोमट लिंबूपाणी
लिंबू अल्कलाइनयुक्त असल्यामुळे रक्तातील युरिक अॅसिड नैसर्गिकरित्या निष्क्रिय होतं. २०१७ च्या अभ्यासात सिद्ध झालं की, “ताजं लिंबूपाणी युरिक अॅसिड कमी करतं.” सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळा, शरीरातील विषद्रव्ये साफ होतील आणि किडनीची कार्यक्षमता वाढेल.
३) अजमोदा (सेलरी) (ओवा) दाणे
अजमोदा दाणे शरीरातील सूज कमी करणारे व मूत्रल (डाययुरेटिक) आहेत. २०१९ च्या अभ्यासात आढळलं की, अजमोदा अर्काने सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाला. सूप, सलाड, काढा किंवा ज्यूस कोणत्याही स्वरूपात त्याचे सेवन करा!
४) सफरचंद
सफरचंदातील मॅलिक अॅसिड रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण संतुलित ठेवते. २०१६ च्या अभ्यासानुसार हे अॅसिड गाऊटचा धोका कमी करतं. दररोज एक सफरचंद हीच नैसर्गिक थेरपी!
५) ग्रीन टी
ग्रीन टीमधील कॅटेचिन्स शरीरातील xanthine oxidase हा युरिक अॅसिड तयार करणारा एन्झाइम थेट रोखतात, त्यामुळे अॅसिडची निर्मिती कमी होते. दिवसातून १–२ कप साखर न घातलेले ग्रीन टी प्या.
६) काकडी
काकडीत पाणी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे ती किडनीचं कार्य सुधारते आणि युरिक अॅसिडचे जमा झालेले क्रिस्टल्स बाहेर काढण्यास मदत करते. दररोज सलाडमध्ये आणि पाण्यात इन्फ्युज करून जरूर खा.
७) लो-फॅट दुग्धजन्य पदार्थ
२००४ च्या ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मधील संशोधनात सिद्ध झालं की, लो-फॅट दूध आणि दही युरिक अॅसिड कमी करण्यास अत्यंत उपयुक्त आहेत. यातील केसीन आणि लॅक्टअल्ब्युमिन हे प्रथिने अॅसिड बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान करतात.
युरिक अॅसिड वाढल्यावर भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. आहार आणि पाण्याचं सेवन योग्य केलं तर ही पातळी अगदी काही दिवसांत कमी होऊ शकते. हे ७ अन्नपदार्थ तुमच्या आहारात त्वरित समाविष्ट करा… आणि सांध्यातील वेदना, किडनीचा त्रास आणि सूज कशी कमी होते ते स्वतः अनुभवा!
(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)

