Holi 2022 : होळीचा सण जवळ आला आहे. आतापासूनच बाजारपेठ रंगीबेरंगी रंगांनी सजलेली दिसत आहे. पण जर तुम्ही ही होळी केमिकलयुक्त रंगांपेक्षा हर्बल रंगांनी खेळण्याचा विचार करत असाल तर या टिप्स वापरून पहा. रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने त्वचेवर मुरुम, अॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. दुसरीकडे, हर्बल रंगांनी होळी खेळल्याने तुमची त्वचा चमकदार राहते. चला जाणून घेऊया घरी हर्बल कलर कसा बनवायचा.

हिरवा रंग

हिरव्या रंग बनवण्यासाठी प्रथम कडुलिंबाची पाने सुकवून बारीक करून मग त्याची पावडर किंवा पेस्ट बनवा. कडुलिंबाचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कडुनिंबात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि ऍलर्जीक गुणधर्म असतात ज्यामुळे मुरुम यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते. हिरवा रंग करण्यासाठी कडुनिंबाशिवाय पालकही वापरत येईल.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी

(हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात? जाणून घ्या)

नारिंगी रंग

केशरी रंग बनवण्यासाठी पलाशच्या फुलांचा वापर करा. यासाठी होळीच्या एक दिवस मध्यरात्री पलाशची फुले पाण्यात टाकवीत. सएकळी फुले पण्यातून काढुन टाका. तुमचा रंग तयार झाला आहे.

(हे ही वाचा: Skin Care: उन्हाळ्यात त्वचेला संसर्गापासून वाचवतो तुळशीचा पॅक; जाणून घ्या कृती)

गुलाबी आणि लाल रंग

गुलाबी किंवा लाल रंगासाठी तुम्ही बीट वापरू शकता. जर तुम्हाला डार्क गुलाबी रंग हवा असेल तर बीट वाळवून बारीक करून त्याची पावडर बनवा. याशिवाय लाल रंगासाठी बीट बारीक करून पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार करा.