होळी हा रंगांचा सण आहे. संपूर्ण देशात हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. यंदा १८ मार्च रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. अनेकजण तर होळीच्या काही दिवस आधीपासूनच तयारी सुरु करतात. अशातच ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे त्यांच्यासाठी त्यांची पहिली होळी खूपच खास असणार आहे. नवविवाहित जोडप्यासाठी लग्नानंतरची प्रत्येक गोष्ट खूप खास असते. लग्नानंतरची ही तुमची पहिली होळी असेल तर तुम्हीही या सणासाठी खूप उत्सुक असाल. त्यामुळेच लग्नांनंतरची तुमची पहिली होळी अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता.

एकसारखे कपडे :

यंदाच्या होळीला तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकसारखे कपडे घालू शकता. हा सण खास बनवण्यासाठी तुम्ही दोन्ही पारंपरिक मॅचिंग पोशाख घालू शकता. तुम्ही मॅचिंग किंवा कलर कॉर्डिनेटेड पोशाख घालू शकता. यावेळी खूप सारे फोटो क्लिक करायला विसरू नका. या अशा आठवणी आहेत ज्या तुम्ही नेहमी जपत राहाल.

Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

एकत्र पारंपारिक पदार्थ बनवा :

पारंपरिक मिठाईशिवाय होळीचा सण अपूर्ण आहे. हा सण आणखी खास बनवण्यासाठी या दिवशी एकत्र मिठाई किंवा इतर काही पदार्थ बनवा. जर तुम्हा दोघांना स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसेल, तर तुम्ही इंटरनेट किंवा कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला देखील घेऊ शकता.

Holi 2022 : भारतासोबतच ‘या’ देशांमध्येही उत्साहाने साजरी केली जाते होळी! जाणून घ्या पद्धत

एकमेकांना भेटवस्तू द्या :

तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊन तुमची पहिली होळी खास बनवा. या निमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचे गिफ्टही देऊ शकता. जर तुम्हाला काय गिफ्ट द्यावे हे समजत नसेल तर तुम्ही मोबाईल किंवा कार ऍक्सेसरी, गॅझेट किंवा चॉकलेट बॉक्स इत्यादी गिफ्ट करू शकता.

होळीची सकाळ खास बनवा :

होळी हा रंग आणि आनंदाचा सण आहे. जर तुम्हाला सकाळ थोडी खास बनवायची असेल तर या दिवसाची सुरुवात तुमच्या जोडीदारासाठी स्वादिष्ट नाश्ता बनवून करा. तुमच्या जोडीदाराच्या आवडीचा नाश्ता करा. त्यावर तुम्ही एक सुंदर नोट देखील लिहू शकता.

जोडीदारासोबत फिरायला जा :

यंदा होळीचा सण वीकेंडला येत आहे. फिरायला जाण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाचा बेत आखू शकता. या दरम्यान तुम्ही एकत्र चांगला वेळ घालवू शकाल.