Holi special herbal colours: आपल्याकडे प्रत्येक सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेमधील फाल्गुन या शेवटच्या महिन्यामध्ये होळी साजरी करण्याची प्रथा आहे. फाल्गुनमधील पोर्णिमेला होलिका दहन करत हा उत्सव साजरा केला जातो. तेव्हा खास पुरणपोळी बनवून देवासमोर नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी महाराष्ट्रभर पुरणपोळी आणि कटाची आमटी खाल्ली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. या निमित्ताने देशभरात रंगांची उधळण केले जाते.

होळी-रंगपंचमीला आपण जे रंग वापरतो, ते बनवण्यासाठी हानिकारक केमिकल्सचा वापर केलेला असू शकतो. अशा रंगांमुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त रंग शरीरावर लावल्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये या विषयाबाबत लोक जागरुक झाले आहेत. यामुळे रंग खरेदी करताना ते कशापासून तयार केले आहेत ही माहिती प्रत्येकजण घेत असतो.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

मार्च २०२३ मध्ये ‘या’ ४ राशी होणार श्रीमंत? होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत लक्ष्मी देणार बक्कळ धनलाभाची संधी

हळद, जास्वंद, गुलाब अशा नैसर्गिक पदार्थांपासून तयार केल्या जाणाऱ्या रंगांना ‘हर्बल कलर्स’ (Herbal Colours) असे म्हटले जात आहे. यांना काहीजण ‘नॅचरल कलर्स’ असेही म्हणतात. केमिकलयुक्त रंगांच्या वापराने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी लोक हर्बल कलर्स या पर्यायाकडे वळू लागले आहेत. पण सध्या हर्बल कलर्समध्येही भेसळ करुन लोकांची फसवणूक करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दुकानदार हर्बल कलर्सच्या नावाखाली केमिकलयुक्त रंग विकत आहेत. यामुळे खरे हर्बल कलर्स कोणते हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हर्बल कलर्सची गुणवत्ता तपासणी कशी करावी?

खरेदी केलेले रंग हे नैसर्गिक पदार्थांपासून तयार केले आहेत की, नाही हे शोधण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करु शकता. सर्वप्रथम थोडासा रंग पाण्यामध्ये मिसळा. जर तो रंग पाण्यामध्ये नीट मिसळला गेला, तर तो नैसर्गिकरित्या तयार करण्यात आला आहे हे ओळखावे. रंगाची गुणवत्ता निरीक्षण करुनही पारखता येते. हर्बल कलर्स चमकदार नसतात. त्यांना चांगला सुगंध येत असतो. याउलट केमिकल्स निर्मित रंगांना पेट्रोलसारखा वास असतो.