Holi Hair Care Tips : होळी खेळणं सर्वांना आवडते, पण होळीच्या रंगांमुळे केस खराब होण्याचीदेखील भीती असते. गुलाल, पाणी आणि केमिकलयुक्त रंगांमुळे केस कोरडे, निर्जीव आणि चिकट होतात, कधीकधी हा रंग इतका जाड असतो की तो शॅम्पूने धुतला तरी जात नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काही सोपी पद्धत वापरून केस स्वच्छ करू शकता.
पण, आता होळीच्या रंगामुळे केस खराब होतील याची काळजी करण्याची गरज नाही, कारण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही रंग खेळण्याआधी आणि नंतर काळजी घेणे आवश्यक आहे. लखनऊच्या ग्लोरियस मेकअप स्टुडिओ अँड अकादमी बाय कौर्स येथील ब्युटी अँड हेअर एक्स्पर्ट अमरीश कौर यांनी केसांचे होळीच्या रंगांपासून संरक्षण करण्याबाबत टिप्स दिल्या आहेत.
केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स (Holi 2026 Hair Care Hacks)
होळी खेळण्यापूर्वी काय करावे?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळी खेळताना केस मोकळे सोडू नका. होळी खेळण्यापूर्वी केसांना पूर्णपणे तेल लावा. यासाठी तुम्ही नारळ किंवा बदाम तेलाचा वापर करू शकता. तसेच होळी खेळताना शक्यतो वेणी किंवा अंबाडा बांधा. केसांच्या संरक्षणासाठी तुम्ही स्कार्फ किंवा टोपीदेखील घालू शकता.
तेल लावल्याने तुमच्या केसांचे संरक्षण होते, होळीचे रंग थेट तुमच्या टाळूवर पोहोचण्यापासून रोखले जातात. नंतर केस धुण्यानेही रंग काढून टाकणे सोपे होते.
होळी खेळल्यानंतर सर्वात पहिले काय करायचे?
होळी खेळल्यानंतर लोक सर्वात आधी शॅम्पूने केस धुतात, पण हा योग्य मार्ग नाही. जर त्यांच्या केसांमध्ये खूप कोरडा रंग असेल तर ते हलक्या हाताने ब्रशने काढा, नंतर तुमचे केस अॅपल सायडर व्हिनेगरने धुवा.
अॅपल सायडर व्हिनेगरने केस कसे स्वच्छ करावे?
एक कप कोमट पाण्यात दोन ते तीन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. आता प्रथम तुमचे केस साध्या पाण्याने हलके ओले करा. आता अॅपल सायडर व्हिनेगरचे पाणी केसांवर आणि टाळूवर लावा. यानंतर हलक्या हातांनी तीन ते चार मिनिटे मालिश करा. आता स्वच्छ पाण्याने धुवा.
अॅपल सायडर व्हिनेगर हे सौम्य आम्लयुक्त असते, जे केसांचा रंग आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. ते टाळू स्वच्छ करते आणि खाज कमी करते. आता शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
१) पाणी जास्त गरम नसावे.
२) एकाच वेळी खूप जास्त शॅम्पू लावू नका.
३) गरज पडल्यास दोनदा शॅम्पू करा.
४) केसांना मॉइश्चराइझ राहण्यासाठी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर नक्की लावा.
५) केस लगेच ब्लो ड्राय करू नका.
६) केस ओले असताना जोरात फणी करू नका.
७) पुढील दोन दिवस केसांना तेल लावा.
म्हणून जर तुम्हाला होळी खेळल्यानंतर तुमचे केस रंगविरहित ठेवायचे असतील, तर तुम्ही या पद्धती वापरून पाहू शकता, यामुळे तुमचे केस सुरक्षित आणि मऊ राहतील.
