Holi 2026 Wishes In Marathi: वसंत ऋतूची चाहूल लागली की वातावरणात उत्साहाचे रंग भरू लागतात आणि त्याच आनंदात साजरा होतो होळीचा सण. २०२६ मधील होळीच्या निमित्ताने सर्वत्र आनंद, एकोप्याचा संदेश आणि नव्या सुरुवातींची ऊर्जा अनुभवायला मिळणार आहे. होळीच्या पवित्र अग्नीत नकारात्मकता, राग-रुसवे आणि वाईट प्रवृत्तींचे दहन करून प्रेम, मैत्री आणि सुख-समृद्धीचे रंग उधळण्याचा हा सण आहे.

‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन मासातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. भारतात विविध प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात त्यातलाच एक सण म्हणजे होळी. यंदा २ मार्च रोजी होळी, ३ मार्चला धुलीवंदन तर ८ मार्चला रंगपचमी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे.

या खास पर्वानिमित्त सोशल मीडियावर, कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात शेअर करण्यासाठी खास मराठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पारंपरिक पुरणपोळीचा गोडवा आणि रंगपंचमीच्या उत्साहासह होळी २०२६ आनंदात आणि सुरक्षिततेने साजरी करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

होळीच्या मराठी शुभेच्छा (Holi 2025 Wishes)

आली रे आली, होळी आली,
चला आज पेटवूया होळी,
बांधून दुख-नैराश्याची मोळी,
दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,
करू आनंदाने साजरी सण होळीचा,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

विसरा मनातील सर्व राग-रुसवे,
आनंदाने साजरी करूया रंगांची नवी पहाट,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!”

होळी रे होळी, पुरणाची पोळी!!
सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा!”

Dhulivandan
होळीच्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
नवे रंग तुमच्या जीवनात भरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या माणसांची साथ
पंगतीला पुरणपोळीचा थाट
होळीच्या अग्नित नकारात्मकतेचा होणार नाश
पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्याची सुरुवात
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू पर्यावरण सुरक्षित करू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवून देऊ आणि होळी आनंदाने साजरी करू

Holi
होळीच्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

होळी पेटू दे
द्वेष, चिंता मिटू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीने ओंजळ भरू देत
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

उद्या आहे धूलिवंदन
आज करूया होळीला वंदन
नैवद्य दाखवू पुरणपोळीचा
आनंद लुटू या रंगीबेरंगी सणाचा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

वाईटाचा होवो नाश, आयुष्यात येवो सुखाची लाट
तुम्हा-आम्हा सगळ्यांना होळीच्या भरपूर शुभेच्छा

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा ठेवू लक्षात
आनंद लुटू होळी सणाचा, यशस्वी होवो तुमचा पुढचा प्रवास…
तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

holi
होळीच्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

होळीच्या शुभमुहुर्तावर होईल स्वप्नपूर्ती,
धन,आनंदाने भरेल तुमची झोळी
मनात पेटवा आशेची आग
पूर्ण होऊदेत तुमच्या सर्व अपेक्षा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhuliwandn
होळीच्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन (Dhulivandan) हा सण ही फार जल्लोषात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी रंगांसह होळी खेळली जाते, ज्याला मराठीत धुलिवंदन असे म्हणतात.

कटाची आमटी, पुरणाची पोळीवर मारा ताव
विसरून राग-रुसवे फुगवे मिटवा एकमेकांतला वाद
रंगवू एकमेकांना सप्तरंगात
धुलिवंदनाचा सण एकत्र करू साजरा

भिजुदेत अंग, गुलाबी रंगाने रंगुदेत अंग
नाचण्यात होऊदेत मन दंग
पिचकारीत भरून सारे रंग
धुलिवंदनाला जोडू प्रेमाचा रंग

पाणी वाचवा
नैसर्गिक रंग वापरा
कोणालाही ईजा न पोहचवता
धुलिवंदन करू एकत्र साजरा

आला होळीचा सण लय भारी चल नाचूया
एकच रंग लावून पर्यावरण पूरक होळी खेळूया
धुलिवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.


रंगपंचमीच्या शुभेच्छा!

हातात रंगानी भरलेली पिचकारी
गालावर चढली लाजेची रंगाची लाली
या रंगपंचमीला होऊदेत पूर्ण तुझ्या सगळ्या इच्छा
रंगपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
गुलाबी, गुलालाचा
लाल रंग गुलाबाचा
हिरवा रंग पानांचा
पिचकारीत भरून सारे रंग
खेळू या एकमेकांच्या संग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Rangpanchami
होळीच्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वत:चा विसरुनी…
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!