कोरोनाचा संसर्ग आता पहिल्यापेक्षा कमी झाला असला तरी भविष्यात येणारी करोनाची तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका अजुनही गेलेला नाही. अशा परिस्थितीत, सावधगिरीसह, आपण रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे देखील महत्त्वाचे आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे नैसर्गिक मार्ग आपल्या घरात अस्तित्वात आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काही प्रभावी पेय पिणे. आज आम्ही तुम्हाला याच घरगुती पेयांबद्दल माहिती देणार आहोत.

land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
Surrogacy Rules Changed Marathi News
Surrogacy Rules : सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारकडून बदल; डोनर गेमेट वापरण्याची मुभा, आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना काय फायदा?
benefits of eating foxtail millets
foxtail millet : मधुमेह ते कोलेस्ट्रॉल सर्वांवर गुणकारी ‘बाजरी’! पाहा डॉक्टरांनी सांगितलेले फायदे…

हळदीचा चहा:

नावाप्रमाणेच हे पेय हळद, मध आणि लिंबूने तयार केले जाते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग असतं. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि मजबूत दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे छातीत होणारी जळजळ आणि वेदना देखील कमी करण्यात मदत करते. हळद १५-२० मिनिटे पाण्याने उकळवा आणि चवीनुसार लिंबू आणि मध घालून गरम गरम सर्व्ह करा.

मसाला चहा:

प्रतिकारशक्ती बूस्टर मसाला चहाचे सर्व घटक तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहेत. चहा केवळ सूक्ष्मजीवविरोधी आणि दाहक-विरोधी नाही तर संक्रमण रोखणारे संयुगे निर्माण करण्यास उपयुक्त असतो. कच्च्या मधात असलेल्या फायटोन्यूट्रिएंट्समुळे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध रोखण्यास मदत होते. यात अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजाराशी लढण्याची क्षमता वाढते. किसलेले आले, दालचिनी, मिरपूड, लवंगा, वेलची आणि तुळशीची पाने अर्धा कप पाण्यात ३० मिनिटे उकळा. थोडे मध घालून ते घ्या.

ग्रीन स्मूथी:

ही निरोगी आणि चवदार हिरवी स्मूदी उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त असते. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे छातीतली जळजळ कमी होते आणि शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते. काही पालक, आंबा किंवा अननस, लिंबाचा रस, ताजे चिरलेले आले आणि बदामाचे दूध किंवा दही घ्या आणि ते सर्व मिक्सरमध्ये मिसळा. याला थंड करून ते सर्व्ह करा.

मध लिंबूपाणी:

कोणतीही जास्त मेहनत न घेता तयार करता येणारं हे पेय आहे. हे पेय केवळ घशातील दुखणे आणि खोकल्यावरच उपयुक्त नाही तर श्वसनमार्गाला हायड्रेटेड ठेवते. एका खोल पातेल्यात चार कप पाणी उकळा आणि त्यात किसलेले आले, एक इंच दालचिनीची काडी, तीन चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, एक चमचा पुदिन्याचा रस आणि लिंबाचा रस घाला. या सर्व मिसळवा. काही मिनिटे थंड करा आणि मध घाला.

काढा

स्वयंपाकघरात अगदी सहज मिळतील अशा पदार्थांपासून तयार केलेला घरगुती काढा हा सर्वात पारंपारिक पेयांपैकी एक आहे. बहुतेकदा लोक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरतात. सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. हे श्वसन विकारांवर देखील उपचार करते. हे तुळस, लवंगा, दालचिनी, आले, कॅरम बिया, हळद आणि मिरपूड उकळून तयार केले जाते. चवीसाठी तुम्ही मध किंवा गूळ घालू शकता.