हवामान काहीही असो, मुरुम, फोड, पिंपल्स आणि त्यामुळे चेहऱ्यावर डाग येणं सामान्य आहे. यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि मुरुम आणि काळे डाग आपल्या चेहऱ्यावर वारंवार येत असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरच्या घरी करता येतील असे खास उपाय सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही पिंपल्स आणि काळे डाग यापासून सूटका मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया असे काही उपाय जे या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
मुरुमांच्या डागांसाठी घरगुती उपाय | Acne Marks Home Remedies
ग्रीन टी
या उपायासाठी तुम्हाला ग्रीन टीच्या बॅग्स लागतील. ग्रीन टी पाण्यात टाकून चहा तयार करा आणि नंतर बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवण्यासाठी ठेवा. पूर्णपणे गोठल्यानंतर दिवसातून दोनदा या बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्याला मसाज करा. ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स तुम्हाला पिंपल्स आणि डार्क मार्क्सपासून मुक्त होण्यास मदत करतात.




मेथी
मेथीच्या दाण्यांमध्ये दाहकता कमी करणारे गुणधर्म असतात जे चेहऱ्यावर मुरुम, ब्लॅकहेड्स आणि इतर स्कीन इन्फेक्शना रोखतात. यासाठी मेथीचे दाणे एका भांड्यात भिजवून घ्या आणि सुमारे ५ तासांनंतर बारीक पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा.
आणखी वाचा : Indian Railway New Rules : ट्रेनने प्रवास करताना ही चूक कधीच करू नका, हा नवीन नियम एकदा वाचाच!
अॅलोवेरा जेल
अॅलोवेरा जेल त्वचेला थंड ठेवण्यासाठी ओळखलं जातं. ते थेट चेहऱ्यावर लावता येतं. अॅलोवेरा जेलने दररोज चेहऱ्याला हलके मसाज करा, तुम्हाला काळे डाग हलके होताना दिसतील. जर कधी पुरळ उठला तर तुम्ही त्यावर अॅलोवेरा जेल देखील लावू शकता.
लस्सी
चेहऱ्यावरून पुरळ निघून गेले असले तरी डाग राहतात. तर चेहऱ्यावरील हे काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही लस्सीचा वापर करू शकता. लस्सीमध्ये लॅक्टिक अॅसिड आढळतात. यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि डाग कमी होतात.
व्हिटॅमिन सी
लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. मुरुमांचे डाग दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी प्रभावी आहे. तुम्ही व्हिटॅमिन सी सीरम किंवा लिंबूवर्गीय फळांचा रस चेहऱ्यावर लावू शकता. तुम्हाला हवं असल्यास या फळांपासून फेस पॅक किंवा फेस मास्क बनवा आणि तो चेहऱ्यावर लावा.