scorecardresearch

Premium

Health Tips: सकाळी पोट साफ होत नाही? ‘हे’ घरगुती उपाय करा; झटक्यात दूर होईल बद्धकोष्ठतेची समस्या

सकाळी उठल्यानंतर पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवसभर एकप्रकारची अस्वस्थतता जाणवते.

Home Remedies for constipation
बद्धकोष्ठता ही पोट आणि पचनाशी संबंधित समस्या आहे. (फोटो-लोकसत्ता)

सकाळी उठल्यानंतर पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवसभर एकप्रकारची अस्वस्थतता जाणवते. कुठल्याही आजाराची सुरुवात पोटापासून होते असे म्हटले जाते. पोट साफ नसेल तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते. बद्धकोष्ठता ही पोट आणि पचनाशी संबंधित समस्या आहे. बद्धकोष्ठतेचा (constipation) जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी लोक विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात पण तरीही यातून काहीच उपायोग होत नाही. बदलती जीवनपध्दती, चुकीच्या जेवणाच्या सवयी, सकस आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव आदी विविध कारणांमुळे बध्दकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागत असतो.

ज्या लोकांचा आहारामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते त्यांना शक्यतो बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळे मल जड होते आणि शौचास त्रास होतो. अशा स्थितीत बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक खाद्यपदार्थ आहेत जे हा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरतात. काही पदार्थ जर का रात्री झोपण्यापूर्वी खाल्ले किंवा पयायले तर दुसऱ्या दिवशी सकाळी पॉट सहज साफ होते. तर हे पदार्थ कोणकोणते आहेत हे जाणून घेऊयात.

love yourself
प्रेम स्वत:वरही करावं..
divocrce & term insurance
Money Mantra: घटस्फोटाचा टर्म विम्यावर कशाप्रकारे परिणाम होतो?
what is Binge Drinking
Binge Drinking : महिन्यातून एकदा दारूचे अतिसेवन केल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Guru And Rahu Yuti
३० ऑक्टोबरपासून सिंहसह ‘या’ राशींना मिळेल अपार धन? राहू अन् गुरुची अशुभ युती संपल्याने येऊ शकतात सुखाचे दिवस

हेही वाचा : Hair Care: दाट आणि लांब केस हवे आहेत? मग करा ‘या’ पाच तेलांचा वापर, जाणून घ्या

जवस (Flaxseeds)

जवस (Flaxseeds) खाण्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यातील फायबर्समुळे पॉट नियमितपणे साफ होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही आहारामध्ये १ ते २ चमचे जवस बियांचा समावेश करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी ते खावे आणि थोडे पाणी प्यावे. सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यास मदत होईल. किंवा या बिया तुम्ही थोड्या भाजून नाश्त्याच्या वेळी देखील खाऊ शकता.

दूध आणि तूप

बद्धकोष्ठतेमुळे मल जड होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही एक ग्लास गरम दूध आणि त्यात २ चमचे टोपा मिक्स करून ते पिऊ शकता. दूध आणि तूप एकत्रित करून प्यायले की, सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात निरोगी फॅट्सचं समावेश करणे हा देखील एक चांगला मार्ग आहे. ड्राय फ्रुट्स, नारळ, तूप, ऑलिव्ह ऑइल या पदार्थांचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो.

हेही वाचा : Parenting Tips: मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी प्रत्येक आईला माहीत असल्या पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

सफरचंद

बद्धकोष्ठता दूर करण्याचा फायबर हा एक उत्तम उपाय आहे. त्यासाठी तुम्ही सफरचंडचे सेवन करू शकता. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्त्यात असणाऱ्या गुणधर्मांमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Home remedies for constipation what to eat milk apple flaxseeds ghee at night tmb 01

First published on: 26-09-2023 at 11:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×