उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो काही वेळेस ही उचकी थांबते तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो. उचकी येण्याची अनेक कारणे असतात. लागोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. आयुर्वेद तज्ञ डॉ. नितिका कोहली यांनी उचकीवरील प्रभावी घरगुती उपाय आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहे. जाणून घेऊया उचकी येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उचकी का लागते?

ज्या गोष्टी डायाफ्रामला किंवा डायाफ्रामला जोडणाऱ्या मज्जातंतूंना त्रास देतात त्यांना फ्रेनिक आणि व्हॅगस नर्व म्हणतात. यामध्ये कार्बोनेटेड पेये किंवा अल्कोहोल खूप वेगाने खाणे किंवा पिणे यामुळे परिणाम होतो. काही वैद्यकीय परिस्थिती जसे की ऍसिड रिफ्लक्स, ट्रिगर होऊ शकते तसेच उचकी देखील लागू शकते.

आणखी वाचा : Tooth Pain Home Remedies: रात्रीच्या वेळी सतावतेय भयंकर दातदुखी? यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

उचकी थांबवण्यासाठी उपाय

  • उचकी थांबवण्यासाठी तुम्ही वेलची पावडर आणि कोमट पाणीचा वापरू शकता. यासाठी तुम्हाला एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा वेलची पावडर टाकून उकळवा आणि १५ मिनिटांनी गाळून प्या.
  • उचकीपासून मुक्त होण्यासाठी  फक्त एक चमचा साखर हवी आहे. कदाचित यापेक्षा चांगला उपाय सापडणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा साखर घ्यायची आहे आणि ती हळूहळू चावून खावी लागेल. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.
  • तिसरा उपाय म्हणजे काळी मिरी. पण ते खाण्याची गरज नाही तर काळी मिरी चा वास घ्या. असे केल्याने तुम्हाला लगेच शिंका येण्यास सुरुवात होईल कारण शिंका आल्याने उचकी शांत होऊ शकते.
  • चौथा उपाय म्हणजे दही, हा देखील उचकी थांबवण्याचा उत्तम उपाय आहे. उचकी झाल्यास,  एक चमचा दही खा, असं केल्याने उचकी लगेच थांबेल.
  • उचकी शांत करण्यासाठी आल्याचा तुकडा घ्या आणि हळू हळू चावा कारण आल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात, जे उचकी दूर करण्यासोबतच अनेक समस्यांपासून देखील आराम देऊ शकतात.
  • सूर्यनमस्कार आणि प्राणायाम हे दोन योगासन आहेत जे हिचकीपासून आराम मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies for hiccups pdb
First published on: 27-09-2022 at 14:44 IST