Home Hacks to Get Rid of Lizards: घर स्वच्छ असणं सगळ्यांनाच आवडतं. पण, तरीही ट्यूबलाइटच्या मागे, भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये किंवा स्वयंपाकघरात पाली डोकावतच राहतात. या जीवांमुळे केवळ घाण वाटतं असं नाही, तर त्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतात. सर्वात मोठी भीती म्हणजे पाल एखाद्या अन्नपदार्थात पडू शकते त्यामुळेच पालीपासून विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यांना घराबाहेर हाकलण्यासाठी आपण बाजारात मिळणारी रसायनं वापरतो, पण तीच आपल्या शरीरासाठी आणखी घातक ठरतात. तुम्हीलाही असाच त्रास होत असला तर आता रासायनिक स्प्रे वापरण्याची गरज नाही. अगदी घरात असलेल्या पाच रुपयांच्या गोष्टी वापरून तुम्ही पालींचा कायमचा बंदोबस्त करू शकता; तेही नैसर्गिक, आरोग्यासाठी सुरक्षित पद्धतीने. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतो आहे, जो केवळ पाच रुपयांच्या गोष्टींनी पालींना कायमच्या घराबाहेर घालवतो, असा दावा व्हायरल व्हिडीओद्वारे करण्यात आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेने खूपच साध्या आणि घरगुती वस्तूंनी पालींना हटवण्याचा उपाय दाखवला आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं की, एक महिला एक कांदा किसते आणि त्याचा रस काढते. त्यानंतर ती रुईच्या वाती ज्या सामान्यतः दिवा लावण्यासाठी वापरल्या जातात त्या कांद्याच्या रसात भिजवते. या भिजवलेल्या वाती ती सेफ्टी पिनमध्ये टाकते आणि त्या घरातल्या विविध कोपऱ्यांमध्ये, विशेषतः जिथे पाली दिसतात तिथे लटकवते.
आता या महिलेचा दावा आहे की, कांद्याचा तीव्र वास आणि त्या विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या उपायामुळे घरातल्या सगळ्या पाली एकदाच घराबाहेर पळतात. या उपायासाठी ना महागडं केमिकल लागतं, फक्त पाच रुपये खर्च करून घरातला कोपरा न कोपरा पालींनी मुक्त होतो, असा दावा हा व्हिडीओ करत आहे.
बघा पाली घरातून गायब करण्याचा उपाय
हा व्हिडीओ chanda_ and_family_vlogs या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. १० हजारांहून अधिक युजर्सने व्हिडीओला लाईक केले असून, अनेकांनी कमेंटमध्ये हा उपाय स्वतःच्या घरी वापरून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे बघून अनेक युजर्स कमेंटमध्ये म्हणतात की, “ही तर सर्वोत्तम आयडिया आहे!”, “आजच ट्राय करतो!”, अशाप्रकारचे कमेंट्स अनेक लोकांनी केले आहे.
लोकसत्ता किंवा इतर अधिकृत माध्यमांनी या दाव्यांची पुष्टी केलेली नाही. ही बातमी व्हायरल व्हिडीओवरून करण्यात आली आहे.