चेहऱ्याबरोबरच आपल्या हातांच्या आणि पायांच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांच्या बोटांची साल निघते. याची अनेक कारणे असू शकतात. कोरडेपणा, अनेकवेळा हात धुणे, केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करणे, बोटांचे टोक चावणे किंवा ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे या समस्येला तोंड द्यावे लागते. वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या नुकसानदायी ठरू शकते. या पार्श्वभूमीवर आज आपण या समस्येपासून सुटका देणाऱ्या काही घरगुती उपचारांबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) एलोव्हेरा जेलचा वापर

एका भांड्यात एलोव्हेरा जेल घ्या. ते थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर या जेलला प्रभावित त्वचेवर लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्याचा वापर करा. हे जेल तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यात मदत करते. ओल्या कापडाने हे जेल काढून टाका. यामध्ये अँटिसेप्टिक गुण असतात जे त्वचेला मॉइस्चराइज करण्यात मदत करतात आणि बोटांची साल निघण्यापासून आराम देतात.

(अतिरिक्त तणाव ठरू शकते गंभीर आजारांचे कारण; ‘या’ सुपर फूडचे सेवन करून दूर करा ताण)

२) दुधाचा वापर

एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या. त्यात गुलाबजल टाका. त्यानंतर या दोन्ही पदार्थांना चांगले एकत्रित करा. या मिश्रणात काहीवेळ आपली बोटे बुडवून ठेवा. सात ते आठ मिनिटांकरीत बोटे बुडवून ठेवा. दुधात लॅक्टिक अ‍ॅसिड असते, ते त्वचा कोमळ बनवण्यात मदत करते. तुम्ही नियमित दिवसातून १ ते दोन वेळा हा उपचार करू शकता.

३) ओट्सचा वापर

एका भांड्यात ओट्सला कच्चे दूध आणि पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर याचे पेस्ट बनवून प्रभावित त्वचेवर लावा. याने काहीवेळ त्वेचीच मालीश करा. काहीवेळ पेस्ट लावून राहून द्या. त्यानंतर पेस्ट काढून टाका. हा उपाय बोटांची साल निघाण्यापासून आराम देऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies to prevent fingertips skin coming out ssb
First published on: 20-09-2022 at 13:46 IST