scorecardresearch

Skin Care: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी उत्तम आहे दहयाचा फेस मास्क, ‘या’ पद्धतीने घरीच करा तयार

लकट त्वचा असलेल्या लोकांना या उन्हाळाच्या दिवसात अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. तेलकट त्वचेला टॅनिंग, मुरुम आणि पुरळ होण्याची शक्यता असते.

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी दह्याचा वापर उत्तम आहे. (photo credit: freepik)

उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक असतात. तीव्र सूर्यप्रकाश आणि घाम येणे यामुळे त्वचेच्या अनेक समस्या जसे की सनबर्न, मुरुम, संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना या उन्हाळाच्या दिवसात अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. तेलकट त्वचेला टॅनिंग, मुरुम आणि पुरळ होण्याची शक्यता असते.

उन्हाळाच्या दिवसात तेलकटपणा नियंत्रित करण्यासाठी तसेच तेलकट त्वचेच्या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर केला जातो, ज्यामुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो.

उन्हाळ्यात चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी दह्याचा वापर उत्तम आहे. चेहऱ्यावर दही वापरल्याने सनबर्न, टॅनिंग, मुरुम, डाग दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर दही लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात. दह्याचा वापर चेहऱ्यावर मसाज करण्यापासून ते स्क्रबिंगपर्यंत करता येतो. दही त्वचेला लावल्याने कोणते फायदे होतात आणि ते चेहऱ्यावर कसे लावायचे ते जाणून घेऊया.

दह्याचे फायदे

उन्हाळ्यात दही लावल्याने चेहऱ्यावरील ओलावा बंद होण्यास मदत होते आणि त्वचा सामान्य होऊ लागते.

उन्हाळ्यात सूर्य त्वचेचा रंग काढून घेतो, अशा स्थितीत चेहऱ्यावर दही वापरल्याने त्वचेचा गडद रंग उजळू लागतो.

उन्हाळ्यात चेहऱ्यावर दही लावल्याने त्वचेतील मृत पेशी निघून जातात, त्यामुळे चेहऱ्याचा रंग स्वच्छ आणि त्वचा नितळ राहते.

प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या दहीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.

दही त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते.

दही पॅक कसा बनवायचा

दही पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दही, अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्या. एका भांड्यात हे सर्व एकत्र करून चांगले मिसळा. २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Homemade curd face pack for oily skin in summer skin care scsm

ताज्या बातम्या