संत्री हे गुणकारी फळ आहे पण तुम्हाला संत्र्याच्या सालीचे फायदे माहीत आहेत का? संत्र्याच्या साली आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहेत. यातील व्हिटामिन सी (C), अँटीऑक्सिडंट्स आणि ऑइल आपल्या स्किनसाठी खूप गुणकारी असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेज येते आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

HT ला दिलेल्या मुलाखतीत ग्लो ॲण्ड ग्रीनच्या फाउंडर ऋचिता आचार्य यांनी स्किनच्या हेल्थसाठी संत्र्याची साल किती फायदेशीर आहे, याविषयी सांगितले. त्या म्हणाल्या की, स्किनच्या कोणत्याही समस्येसाठी संत्र्याच्या सालीचा उपयोग खूप गुणकारी आहे. त्यांनी स्किन टाइपनुसार काही फेस मास्क सुचविले आहे.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

१. तेलकट स्किन (oily skin )
साहित्य :
दोन चमचे तांदळाचं पीठ
एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर
गुलाब जल

एका छोट्या भांड्यात वरील सर्व सामग्री एकत्र करून पेस्ट बनवावी आणि आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावावी.

२. कोरडी त्वचा (dry skin)
साहित्य :
एक चमचा बेसन
एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर, एक चमचा मध, पाणी आवश्यकतेनुसार.

सर्व सामग्री एकत्र करा आणि आठवड्यातून दोनदा लावा. तुम्हाला फरक दिसून येणार.

३. साध्या त्वचेसाठी ( For Normal Skin)
साहित्य :
एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर,
एक चिमूटभर चिंचेची पावडर,
एक चमचा मुलतानी माती,
दूध आवश्यकतेनुसार.

वरील सर्व सामग्री एकत्र करून पेस्ट बनवा आणि आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावा.

हेही वाचा : Burnt Tongue : जेवताना जीभ भाजली? तर मग लगेच करा ‘हे’ चार सोपे उपाय; जाणून घ्या सविस्तर

First Aid & Preventive Health च्या एक्सपर्ट आकांक्षा गुप्ता सांगतात की फळांचे फेसपॅक हे खूप फायदेशीर असते. जर तुम्ही संत्र्याचा वापर करण्याचा विचार करीत असाल तर स्किनसाठी हे फळ उत्तम पर्याय आहे. संत्र्याच्या सालीपासून बनविलेली पावडर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तुम्ही संत्र्याच्या सालीचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. आकांक्षा गुप्ताने काही फेस पॅक सुचविले आहेत.

१. संत्र्याची साल आणि ॲलोवेरा-
एक बाऊल घ्या.
त्यात दोन चमचे फ्रेश ॲलोवेरा टाका.
त्यात दोन चमचे संत्र्याच्या सालीची पावडर टाका.
दोन-तीन थेंब लिंबाचे टाका आणि पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटानंतर चेहरा धुवा.

२. संत्र्याची साल आणि चंदन –
एका बाऊलमध्ये एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि चंदन टाका.
त्यात दोन-तीन थेंब गुलाबजल आणि लिंबाचे टाका.
पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा.
दहा मिनिटांनंतर चेहरा धुवा.

३. संत्र्याची साल आणि दही-
एका बाऊलमध्ये घरी बनविलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर घ्या.
त्यात एक चमचा मध आणि एक चमचा दही टाका.
एकत्र सर्व सामग्री मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
दहा-बारा मिनिटांनंतर चेहरा धुवा.

हेही वाचा : तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे का, हे कसं ओळखाल? त्याच्या ‘या’ सवयींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका…

४. बेसन आणि संत्र्याची साल-
एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन आणि अर्धा चमचा घरी बनविलेले संत्र्याच्या सालीची पावडर टाका.
पेस्ट बनवा आणि त्यात गुलाबजल आणि लिंबाचा रस टाका.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटानंतर चेहरा धुवा.

५. साखर आणि संत्र्याची साल-
एका बाऊलमध्ये घरी बनविलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर टाका.
त्यात अर्धा चमचा साखर टाका.
त्यात गुलाबजल आणि लिंबाचा रस टाका.
हा स्क्रब चेहऱ्यावर घासा आणि चेहरा धुवा.