Homemade Hair Oil : केस सुंदर, मुलायम असावेत ही इच्छा सगळ्यांचीच. चमकदार आणि काळे केस सर्वांना आकर्षित करतात. पण प्रदूषण, खराब आहार आणि तणाव या कारणांमुळे आपले केस कमकुवत आणि निर्जीव होतात. पण धूळ, माती, प्रदूषण, बदलेलेली दोषपूर्ण जीवनशैली, रोजच्या जगण्यातील ताणतणाव यामुळे केस गळतात, खराब होतात. केसांच्या समस्या जटिल असल्यातरी या समस्यांवर उपाय शोधण्याची, महागडे हेअर केअर प्रोडक्टस घेऊन त्यावर पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. घरच्याघरी सहज स्वस्तात केस सुंदर करण्याचा अन केसांच्या समस्या घालवण्याचा उपाय करता येतो. केसांना कांद्याचं तेल लावल्यानं केसांचं सौंदर्य आणि केसांची गुणवत्ता वाढते. केसांना कांद्याचं तेल लावण्याचे फायदे अनेक आहेत. चला जाणून घेऊया कांद्याचे तेल कसे तयार करावे
कांद्याच्या तेलात असे अनेक गुणधर्म असतात जे केस मजबूत करतात, त्यांना काळे आणि चमकदार बनवतात. कांद्याच्या तेलाचा नियमित वापर करून तुम्ही तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करू शकता.घरी कांद्याचे तेल वापरून केस निरोगी ठेवू शकता.ते अधिक सुंदर कसे बनवायचे.




कांद्याचे तेल कसे तयार करावे
कांद्याचे तेल बनवण्यासाठी, कांदा बारीक चिरून घ्या आणि एका पॅनमध्ये तेल (जसे की खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल) मिसळा. यानंतर, हे मिश्रण मंद आचेवर, कांदा सोनेरी होईपर्यंत शिजवा, कांदा सोनेरी झाला की थंड होऊ द्या. यानंतर, गाळणीतून तेल वेगळे करा जेणेकरून फक्त तेल शिल्लक राहील.
केसांना तेल कसे लावायचे
आता हे कांद्याचे तेल तुम्ही केसांना लावू शकता.लक्षात ठेवा कांद्याचे तेल केसांना लावण्यापूर्वी केस पूर्णपणे स्वच्छ आणि धुतले पाहिजेत. कारण घाणेरड्या केसांना तेल लावल्याने केसांच्या समस्या आणखी वाढू शकतात. घाण आणि तेल मिसळल्यामुळे केस अधिक चिकट आणि घाण होतात. तेल फक्त स्वच्छ केसांवर चांगले काम करते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ते लावू शकता आणि सकाळी केस धुवू शकता.
हेही वाचा >> Kitchen Jugaad : कांद्याची साल कचरा समजून चुकूनही फेकू नका, असा उपयोग करा अन् मिळवा अफलातून फायदे
मालिश
केसांना तेल लावल्यानंतर बोटांच्या मदतीने हलक्या हाताने मसाज करा. हे रक्ताभिसरण वाढवते आणि केस मजबूत करण्यास मदत करते.
आठवड्यातून किती वेळा तेल लावायचे
कांद्याचे तेल नियमित वापरू नका. साधारणपणे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा